विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र बंदच्या मुद्द्यावर मुंबई हायकोर्टाने दणका दिल्यानंतर शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांनी हबका खात बंद मधून माघार घेतली. त्यामुळे उद्धव ठाकरेंची पुरती गोची झाली. महाविकास आघाडीत महाराष्ट्र बंद वरून विसंवाद निर्माण झाला. महाराष्ट्र बंदचा निर्णय तसाच पुढे रेटला आणि तो स्वबळावर यशस्वी होऊ शकला नाही, तर आपलीच पंचाईत होईल आणि महाविकास आघाडीत आपण आणखी एकाकी पडू या भीतीने उद्धव ठाकरेंनी देखील महाराष्ट्र बंद मागे घेतला. त्याऐवजी उद्या सकाळी 11.00 वाजता शिवसेना भवनासमोर ते तोंडाला काळी फित लावून बसणार आहेत. Uddhav thackeray also withdrew maharashtra bandh
मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र बंद बेकायदेशीर ठरवल्यानंतर पहिल्यांदा शरद पवारांनी माघार घेतली. त्यामुळे काँग्रेसचे नेतेही बिचकले. नंतर त्यांनी माघार घेतली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनीही बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला. परंतु आंदोलनातून माघार घेत घरी बसण्यापेक्षा ते आता स्वत: रस्त्यावर उतरणार आहेत. उद्या महाराष्ट्र बंद नसला तरी प्रत्येक गावात प्रत्येक शहरात काळ्या फिती लावून निषेध करणार आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत सांगितले.
उद्या महाविकास आघाडीचे नेते काळ्या फिती लावून निषेध करणार आहे. मी शिवसेना भवनासमोरील चौकात उद्य सकाळी 11.00 वाजता तोंडाला काळ्या फिती लावून बसणार आहे. त्याला कोणी मनाई करु शकत नाही. त्याला मनाई केली, तर जनतेचे न्यायालय आहेच. भावना व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
नेमके काय म्हणाले उद्धव ठाकरे?
कायदा ज्यांच्या हातात असतो ते बेजबाबदारपणे वागत असतील त्याचा उल्लेख कोर्टाने केला आहे. कोर्टानेच काल सरकारला विचारले होते. भावना व्यक्त करण्याचा अधिकार लोकांना आहे की नाही. बंद म्हणजे आम्ही दगडफेक करा, हिंसाचार करा, असे म्हटले नव्हते. सर्वांना आपल्या कुटुंबाची काळजी आहे. बहीण, आईची काळजी आहे. तिचे रक्षण करणार कोण आहे, हे सर्वांच्या मनात आहे. यामुळे बंद करायचा प्रयत्न केला. बंद कायद्यानुसार करता येत नसेल तर तोंडच बंद करणार आहोत. मी स्वत शिवसेना भवनातील चौकात जाऊन बसणार आहे. तोंडाला काळीफीत लावणार आहे. मला वाटतं तिथे मला कोणी रोखू शकणार नाही.
दोन तास आंदोलन करणार
मी दोन तास आंदोलन करणार आहे. तोंडाला काळी पट्टी बांधून शिवसेना भवनाजवळ बसणार आहे. माझे रक्षण करण्यासाठी कोणी येत नाही असे लोकांना वाटते, तेव्हा लोक रस्त्यावर उतरतात. बांगलादेशात ते सर्वांन पाहिले आहे. ते आपल्या देशात होऊ नये म्हणून आमचे प्रयत्न आहेत. आमचे आंदोलन थांबणार नाही. आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत राहणार आहे.
सरकार नराधमांना पाठीशी घालवत आहे. उत्स्फूर्तपणे आंदोलन करणाऱ्यांना गुन्हेगार ठरवलं जात आहे. ते स्वतच्या विश्वात मश्गुल आहेत. त्यामुळेच आम्ही आंदोलन करणार आहोत. लोकांना जागरूक करत आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
न्यायालयाने ही तत्परता पुढेही दाखवावी
बदलापूरच्या केसवर आता कोर्ट फास्ट ट्रॅक काय असते ते दाखवेल अशी आशा आहे. काल कोर्टाने जे थोबडवले ते मुख्यमंत्री आणि सरकारला चपराक नाही का? आताही मी कौतुक करत आहे. न्यायालयाच्या भूमिकेचं कौतुक आहे. न्यायालय हे तत्परतेने हलू शकते. तीच तत्परता त्यांनी ज्या कारणासाठी आंदोलन करणार होतो त्यावर दाखवली पाहिजे. आरोपींना शिक्षा सुनावली पाहिजे.
Uddhav thackeray also withdrew maharashtra bandh
महत्वाच्या बातम्या
- Eknath shinde : निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत संवेदनशीलपणे उपाययोजना करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- Ajit Pawar : राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीची सत्तालोलूपता; भाजपच्या सत्तेचे “वळचणवीर” अजितदादांना गृहमंत्री करा!!; पवार गटाची मागणी
- Sheikh Hasina : देश सोडून गेल्यानंतरही शेख हसीना यांच्या अडचणी कायम!
- Shyam Rajak : श्याम रजक यांनी लालू यादवांना दिला मोठा धक्का ; ‘राजद’ सोडला सोडचिठ्ठी!