• Download App
    Uddhav Thackeray along with Sharad Pawar got news of Amit Shah's cannon in Sambhajinagar

    संभाजीनगरात कडाडली अमित शहांची तोफ, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांचा घेतला समाचार

    विशेष प्रतिनिधी

    छत्रपती संभाजीनगर : अवघा देश बाळासाहेबांना त्यांच्या सिद्धांतामुळे मानतो; पण उद्धव ठाकरेंना तर लाज वाटली पाहिजे. ते अशा लोकांसोबत बसले आहेत जे बाळासाहेबांच्या विचाराला विरोध करत होते. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार असूच शकत नाही, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. मंगळवारी छत्रपती संभाजीनगरात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. Uddhav Thackeray along with Sharad Pawar got news of Amit Shah’s cannon in Sambhajinagar

    अमित शहा म्हणाले की, ज्यांनी संभाजीनगरच्या नावाला, सर्जिकल स्ट्राईकला, राम मंदिराला विरोध केला, अशा लोकांसोबत उद्धव ठाकरे बसले आहेत. हे लोक सिद्धांताचे राजकारण करत नाही. केवळ घराणेशाहीचे राजकारण करणारे आहेत. तर शरद पवार यांनी राज्यासाठी व कॉंग्रेसने या देशासाठी काय केले, याचा हिशेब दिला पाहिजे, असा घणाघातही त्यांनी केला.



    संभाजीनगरातून एमआयएमला हाकला!

    छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाबद्दल मला कोणी विचारले तर या ठिकाणी मजलिसचा खासदार असल्याचे सांगावे लागले. पण संभाजीनगरकरांनो मी तुम्हाला विनंती करायला आलो आहे. येथून एमआयआएमला हाकलण्याचे काम तुम्हाला करायचे आहे. तुम्ही मला ग्वाही देणार का, यावेळी संभाजीनगरात कमळ फुलवणार आहात का? असा सवाल त्यांनी उपस्थितांना करताच जमावाने लगेच त्यांना होकार दिला. एमआयएचा पराभव करण्यासाठी सज्ज व्हा, येथे कमळच निवडून आले पाहिजे, असे आवाहन शहा यांनी केले.

    मोदींनी 7.15 लाख कोटींचा निधी दिला

    सोनिया- मनमोहन यांच्या काळात महाराष्ट्रात 10 वर्षांत फक्त 1 लाख 91 हजार कोटींचा निधी दिला गेला होता. पण मोदी सरकारच्या काळात महाराष्ट्राला 7 लाख 15 हजार 890 कोटी रुपयांचा निधी दिला गेला. त्याचबरोबर अनेक 8 लाख कोटींची विविध विकासाचे प्रकल्प दिले गेले. मग शरद पवार साहेब तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही काय केले ते जाहीरपणे येऊन सांगणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

    Uddhav Thackeray along with Sharad Pawar got news of Amit Shah’s cannon in Sambhajinagar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य

    Nishikant Dubey : खासदार निशिकांत दुबे म्हणाले- कोर्ट कायदा बनवणार असेल तर संसद बंद करा; सुप्रीम कोर्ट सीमा ओलांडत आहे