‘’…त्याच काळात ठाकरे गटाच्या बगल बच्च्याना बेड कव्हर आणि बॉडी कव्हरचे धंदे मिळत होते’’ असंही शेलार यांनी म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ठाकरे गट मुंबई महापालिकेतील ठेवींसंदर्भात शिंदे – फडणवीस सरकारला जाब विचारण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात १ जुलै रोजी मोर्चा काढणार आहे. यावरून आता भाजपाकडून ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. भाजपा आमदार आशिष शेलारांन या पार्श्वभूमीवर पत्रकारपरिषदेत बोलताना टीका केली आहे. Uddhav Balasaheb Thackeray group defamed Mumbai Municipal Corporation Ashish Shelar
आशिष शेलार म्हणाले, ‘’उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा पुरता बदनाम झाला आहे, संजय राऊतांना तर नामच नाही. जो माणूस स्वत:लाच धमक्या देऊन घेऊन संरक्षण मागतो. त्याने नाम, बदनाम यावर बोलूच नये. मुंबई महापालिकेला बदनाम उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केलं.’’
याचबरोबर ‘’मुंबईकरांच्या खिशातील पैसा मुंबईकरांना सेवा मिळण्यासाठी आवश्यक होता. कोरोना काळात रुग्णांना बेड्स मिळणे आवश्यक होते, पण आरोग्य सुविधा मिळत नव्हत्या. त्याच काळात ठाकरे गटाच्या बगल बच्च्याना बेड कव्हर आणि बॉडी कव्हरचे धंदे मिळत होते. यांचे बगलबच्चे आणि जवळचे आता उघडे पडत आहेत, म्हणून या सगळ्यांवर पांघरूण घालण्यासाठी, मोर्चाची सगळी नौटंकी सुरू आहे.’’ असंही शेलारांनी यावेळी सांगितलं.
याशिवाय, ‘’जनतेसमोर सत्य येतय, पुढेही येईल, आम्ही आणत राहू. भ्रष्टाचार, मुंबई महापालिकेतील मुंबईकरांच्या पैशांचा अपव्यव्हार याचं दुसरं नाव म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. जनतेला हवालदिल करण्याचं पाप हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केलं आहे.’’ असं देखील आशिष शेलार यावेळी म्हणाले.
Uddhav Balasaheb Thackeray group defamed Mumbai Municipal Corporation Ashish Shelar
महत्वाच्या बातम्या
- मायक्रोन गुजरातमध्ये उभारणार पहिला सेमीकंडक्टर प्लांट; 6,700 कोटींच्या गुंतवणुकीने 5,000 नोकऱ्यांची निर्मिती
- ‘’राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही दिवसांनी टोळीयुद्ध दिसणार’’ आशिष शेलारांचं भाकीत!
- बंगाल के माजी मुख्यमंत्री बुद्धदेव यांची कन्या होणार पुरुष, सुचेतना सेक्स चेंज केल्यानंतर सुचेतन बनणार
- ‘टायटॅनिक’चे अवशेष शोधण्यास गेलेल्या पाणबुडीचा स्फोट, सर्व पाच जणांचा मृत्यू