• Download App
    Uddav Thackeray उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदारांची बैठक; २० पैकी किती राहणार हजर आणि किती राहणार गैरहजर??; आकड्याकडे लक्ष!!

    उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदारांची बैठक; २० पैकी किती राहणार हजर आणि किती राहणार गैरहजर??; आकड्याकडे लक्ष!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : ठाकरे गटाच्या तब्बल 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. यासोबतच आदित्य ठाकरेंचे अत्यंत विश्वासू आणि ठाकरे गटाचे नेते सचिन आहिर यांनीही थेट शिवसेना शिंदे गटाची वाट धरली. शिवसेना शिंदे गटात दाखल होताच सचिन आहिर यांना थेट विधान परिषदेचे उपसभापतीपद मिळाले. Uddav Thackeray

    6 खासदार गेल्यानंतर जेवढा धक्का उद्धव ठाकरेंना बसला नव्हता, त्यापेक्षा कितीतरी जास्त पट त्यांना सचिन आहिर यांनी ठाकरे गटाची साथ सोडल्यानंतर बसला. एकनाथ शिंदे एका मागून एक मोठे धक्के उद्धव ठाकरे यांना देत आहेत. ठाकरे गटात मोठी बंडखोरी होत आहे. त्यामध्येच गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा रंगत आहेत की, शिवसेना ठाकरे गटाचे काही आमदारही एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. कोणत्याही क्षणी बंडखोरी होऊ शकते. यावरच आता उद्धव ठाकरे यांनी अत्यंत मोठा निर्णय घेतला. Uddav Thackeray



    – उद्धव ठाकरे सतर्क

    उद्धव ठाकरे यांनी बंडखोरीच्या मुद्द्यात अधिक सर्तक राहण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे यांनी आमदारांची बंडखोरी टाळण्यासाठी मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावली आहे. उद्धव ठाकरे यांच्याआदेशानंतर पक्षातील सर्व आमदारांसोबत संपर्क साधून त्यांना येत्या मंगळवारी सायंकाळी ७.०० वाजता बैठकीस हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. पक्षाने ही तातडीची बैठक बोलावली आहे. पण या बैठकीला २० आमदारांपैकी किती आमदार हजर राहतात आणि किती आमदार गैरहजर राहतात??, या आकड्याकडे आता सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले.

    पक्षफुटीच्या चर्चांवर उद्धव ठाकरे स्वत: आमदारांसोबत संवाद साधणार आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये आमदार फुटणार नाहीत, याची काळजी उद्धव ठाकरे घेत आहेत. सचिन आहिर यांच्यानंतर अजूनही काही आमदार फुटणार का? अशी चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर थेट उद्धव ठाकरे यांनी आमदारांची बैठक बोलावली.

    6 खासदारांनी ठाकरे गटातून बंडखोरी करण्यापूर्वीही खासदारांची बैठक उद्धव ठाकरे यांनी बोलावली होती. त्यावेळी काही खासदार ऑनलाईन पद्धतीने बैठकीत सहभागी झाले होते. मात्र, बैठकीत उपस्थित असलेल्या खासदारांनीही मोठी बंडखोरी केली. त्यानंतर या खासदारांच्या मतदार संघात जाऊन उद्धव ठाकरे यांनी सभा घेतल्या आणि यांच्यावर जोरदार टीका केली होती. आता उद्धव ठाकरेंनी आमदारांची बैठक बोलावली.

    Uddav Thackeray calls meeting of Shivsena MLAs

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Dattatray Bharne : पीक विम्यात खोटी माहिती दिल्यास पाच वर्षांची बंदी:31 जुलैपूर्वी पीक विमा उतरवा- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

    Maharashtra Weather : आगामी 4 दिवस महाराष्ट्रात पाऊस; बंगालचा उपसागर, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण, राज्यातील 6 जिल्ह्यांना रेड, 10 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

    Shrikant Shinde : पक्षप्रवेशापूर्वी ‘तळ्यातमळ्यात’ भूमिकेमुळे अडचण; मंत्रिमंडळ विस्तारात ओमराजे वेटिंगवर, बारणे-शिंदे आघाडीवर!