प्रतिनिधी
मुंबई : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्याभिषेक दिन संपूर्ण महाराष्ट्रभर उत्साहात साजरा होत असताना त्याचे भव्य आयोजन शिंदे – फडणवीस सरकारने रायगडावर केले होते. आज तिथे दिवसभर मोठे कार्यक्रम झाले मात्र या कार्यक्रमांवरून खासदार सुनील तटकरे यांचे मानापमान नाट्य घडले, तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रायगडावरच्या कार्यक्रमावर टीकास्त्र सोडले. Udayanraj addressed those opposing the coronation program of Shiva
मात्र या टीकांना प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभागी झालेले छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. रायगडावर मनापासून आयोजित केलेल्या कार्यक्रमांना विरोध करणारे सगळे स्वतःचा आळशीपणा आणि नाकर्तेपणा झाकण्यासाठी टीका करत आहेत, अशा शब्दांत उदयनराजेंनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे.
शिवराज्याभिषेकाचा कार्यक्रम तिथीनुसार शिंदे – फडणवीस सरकारने आयोजित केला होता आणि त्यालाच नेमका मिटकरी आणि आभाळांचा विरोध होता, तर तटकरेंना रायगड जिल्ह्याचे खासदार असतानाही सरकारी कार्यक्रमात बोलू दिले नाही म्हणून ते कार्यक्रम अर्धवट सोडून बाहेर गेले आणि प्रसार माध्यमांकडे त्याविषयी तक्रार केली.
राष्ट्रवादीच्या या नेत्यांना छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. शिवराज्याभिषेक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी कोणी या नेत्यांचे हात बांधून ठेवले नव्हते. पण त्यांनीच आळशीपणामुळे आणि नाकार्तेपणामुळे कार्यक्रम आयोजित केले नाहीत आणि आता ज्यांनी मनापासून कार्यक्रम आयोजित केले त्यांच्यावर टीका करत आहेत. सध्या तटकरे नेमके कुठल्या पक्षात आहेत?, असा खोचक सवाल उदयनराजे यांनी केला.
Udayanraj addressed those opposing the coronation program of Shiva
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधी यांनी मुस्लिम लीगला दिले धर्मनिरपेक्ष पक्षाचे प्रमाणपत्र, भाजपचा पलटवार- असे सांगणे त्यांची मजबुरी!
- Chief Minister Relief Fund : आता एका मिस्ड कॉलवर मिळणार मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा अर्ज; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय
- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला आज ३५० वर्षे पूर्ण
- मुंबईच्या मालवणीत बांगलादेशींनी उभारलेल्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा