प्रतिनिधी
मुंबई : संजय राऊत यांनी विधिमंडळाला चोरमंडळ म्हटल्यामुळे महाराष्ट्र विधिमंडळात निर्माण झालेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळातील मंत्री उदय सामंत यांनी संजय राऊत यांच्या वर्मावर बोट ठेवले आहे. संजय राऊत आम्हाला नेहमी गद्दार, खोकेवाले असे वाट्टेल ते बोलत असतात. पण आज त्यांनी थेट विधिमंडळाचा अपमान केला आहे. पण आम्ही जर पक्षाचा आदेश डावलून राज्यसभा निवडणुकीत मतदान केले असते तर संजय राऊत खासदार तरी झाले असते का??, असा सवाल करून उदय सामंत यांनी राऊतांच्या वर्मावर बोट ठेवले आहे. Uday samant targets Sanjay Raut over his rajyasabha elections
संजय राऊत हे शिवसेनेची 42 मते मिळून राज्यसभेत खासदार झाले. त्यांना एखाद दुसरे मत जरी कमी पडले असते, तरी ते या निवडणुकीत पडले असते. या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी राऊत यांना खासदार करणारे मतदार सगळे शिवसेनेचे आमदार होते, याकडे त्यांचे लक्ष वेधले आहे. त्यानंतरच विधानपरिषद निवडणूक झाली. तेव्हा शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. पण काँग्रेसचे उमेदवार पडले. त्यानंतर शिवसेनेत बंडखोरीच्या घडामोडी घडल्या. त्याच आधी घडल्या असत्या तर संजय राऊत खासदारच झाले नसते. त्यांच्याऐवजी कोल्हापूरचे संजय पाटील खासदार झाले असते, हेच अप्रत्यक्षपणे उदय सामंत यांनी निदर्शनास आणून दिले. असून यातून त्यांनी संजय राऊत यांच्या वर्मावर बोट ठेवले.
संजय राऊत यांचे शिवसेनेचे संसदीय नेतेपद गेले आहे त्यांच्या ऐवजी गजानन कीर्तिकर हे शिवसेना पक्षाचे लोकसभा आणि राज्यसभा मिळून असे संसदीय नेते बनले आहेत. याच राजकीय पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना विधिमंडळाला ते चोरमंडळ ते म्हणाले. त्यातून मोठा गदारोळ उठला. विधिमंडळात भाजप – शिंदे गट यांच्या आमदारांनी जोरजोरात भाषणे केली. संजय राऊत यांना जबरदस्त धारेवर धरले. पण उदय सामंत यांनी संजय राऊत खासदार कुणामुळे झाले??, ते राज्यसभेत कसे पोहोचले??, याचेच राजकीय इंगित सांगून त्यांच्या वर्मावर बोट ठेवले आहे.
Uday samant targets Sanjay Raut over his rajyasabha elections
महत्वाच्या बातम्या
- एसटी कर्मचाऱ्यांचे पगार दर महिन्याच्या 7 तारखेला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
- मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांचे दिल्लीतील मंत्रिपदांचे राजीनामे; पण नवाब मलिकांनी अखेरपर्यंत दिला नव्हता राजीनामा!!
- मनीष सिसोदिया यांना सुप्रीम कोर्टाची फटकार; हायकोर्टात जायचे सोडून थेट सुप्रीम कोर्टात कसे आलात??
- सचिन वाझे, अँटिलिया स्फोटके, मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणावर लवकरच वेब सिरीज