१ नोव्हेंपासून शैक्षणिक वर्ष होईल. परंतु तेव्हाच दिवाळी असल्यानं कदाचित दिवाळीनंतर शैक्षणिक वर्ष सुरू होईल.तेव्हाच फिजिकल कॉलेज सुरू करण्याचा विचार करतोय, असं उदय सामंत म्हणाले.Uday Samant said – The academic year starts on November 1 and the college starts after Diwali
विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोना विषाणू संसर्गाचा भारतात शिरकाव झाल्यानंतर गेल्यावर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन करण्यात आलं. लॉकडाऊन करण्यात आल्यापासून ऑफलाईन पद्धतीनं कॉलेज सुरु झालेली नाहीत. महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी कॉलेज कधी सुरु होणार यासंदर्भात माहिती दिली आहे. यंदाचं शैक्षणिक वर्षा 1 नोव्हेंबरपासून सुरु होईल. मात्र, प्रत्यक्षात कॉलेज दिवाळीनंतर सुरु होतील, असं सामंत म्हणाले.
१ नोव्हेंपासून शैक्षणिक वर्ष होईल. परंतु तेव्हाच दिवाळी असल्यानं कदाचित दिवाळीनंतर शैक्षणिक वर्ष सुरू होईल.तेव्हाच फिजिकल कॉलेज सुरू करण्याचा विचार करतोय, असं उदय सामंत म्हणाले. महाविद्यालय सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी यायचे की नाही हे त्यांनी ठरवावे. उपस्थित राहण्यासाठी विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारची सक्ती केली जाणार नाही, असं उदय सामंत म्हणाले.
उदय सामंत यांनी कॉलेज सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील असं म्हटलं आहे. कोरोना कमी झालेला आहे, तिथं कॉलेज सुरू करायला काहीच अर्थ नाही. पण याकरीता मुख्यमंत्र्यांची परवानगी लागेल, असं सामंत म्हणाले.
राज्यातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राचार्य भरतीला तत्वत: मान्यता मिळालीय. सोमवारी किंवा मंगळवारी प्राध्यापक भरतीची फाईल अर्थ विभागाकडे जाईल. राज्यात ३०७४ प्राध्यापकांच्या जागा रिकाम्या आहेत. सीएचबी तत्वावर प्राध्यापकांनाही चांगले मानधन मिळेल याचाही विचार करतोय.
चक्रीवादळामुळं विद्यार्थी देखील पूरस्थितीमुळं परीक्षेला मुकले होते. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सकाळी सीईटी परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देत पुन्हा परीक्षा घेणार असल्याचं सामंत म्हणाले.
Uday Samant said – The academic year starts on November 1 and the college starts after Diwali
महत्त्वाच्या बातम्या
- टॉप १० श्रीमंत व्यक्ती २०२१! मुकेश अंबानी २०२१ मध्येही सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत
- धर्मांतरप्रकरणी यूपीतील मौलवींच्या अटकेविरोधात मुस्लिम संघटनांचे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन, आरोप हटवून सोडण्याची मागणी!
- Good News : दिवाळी दणक्यात ! केंद्रीय कर्मचाऱ्यांना ‘डबल बोनस’ ; जाणून घ्या नक्की किती रक्कम मिळणार ?
- मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी पोहोचले दिल्लीला