विशेष प्रतिनिधी
मुंबई : Uday Samant विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सलग धक्के बसत आहेत. राज्यभरात अनेक नेते ठाकरे गट सोडून महायुतीत प्रवेश करत आहेत. आता या यादीत रत्नागिरी जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्याचं नावही जोडलं जाण्याची शक्यता आहे. राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी एका पत्रकार परिषदेत दिलेल्या वक्तव्यामुळे ठाकरे गटात मोठी खळबळ माजली आहे.Uday Samant
रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना उदय सामंत म्हणाले की, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरीतून ठाकरे गटाकडून लढलेले उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळ माने हे भाजप प्रवेशासाठी प्रयत्नशील आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सहाय्यकामार्फत त्यांचे हालचाली सुरू आहेत. या वक्तव्यामुळे रत्नागिरीच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.Uday Samant
याचबरोबर सामंतांनी आणखी धक्कादायक दावा करताना सांगितले की, माने भाजपमध्ये प्रवेश करताना माझा अडथळा होऊ नये म्हणून मला देखील संदेश पाठवले गेले. या विधानामुळे ठाकरे गटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक पातळीवर मोठ्या उलथापालथीची शक्यता वर्तवली जात आहे.Uday Samant
महायुतीच्या रणनीतीवर सामंतांची भूमिका स्पष्ट
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले की, महायुतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे. योग्य वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघे नेते एकत्र येऊन तो फॉर्म्युला जाहीर करतील. ते पुढे म्हणाले की, ही निवडणुका आमच्या कार्यकर्त्यांच्या आहेत. आम्ही स्वबळाचा नारा देणार नाही, तर सर्व घटक पक्षांचा विचार करूनच उमेदवारी व वाटप ठरवले जाईल. स्थानिक पातळीवर काही मतभेद असतील, पण त्यावर तोडगा काढण्याचा अधिकार या तिन्ही नेत्यांकडे आहे. या वक्तव्यातून उदय सामंत यांनी महायुतीतील एकजूट आणि सामंजस्याचे संकेत दिले आहेत.
राज ठाकरे–उद्धव ठाकरे भेटींवर टीका
गेल्या काही दिवसांत मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात वाढलेल्या गाठीभेटीमुळे राज्यात संभाव्य युतीबाबत चर्चा रंगत आहे. या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला. जे वीस वर्षे एकत्र नव्हते, ते आता गळ्यात गळे घालून फिरत आहेत, अशी टीका करत सामंतांनी दोन्ही ठाकरे बंधूंच्या नव्या समीकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या विधानामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांची मालिका सुरू झाली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची आगामी स्थानिक निवडणुकीसाठी संभाव्य युतीची चर्चा अधिकच जोर धरू लागली आहे.
ठाकरे गटासाठी आणखी एक धक्का
उदय सामंत हे कोकणातील प्रभावी आणि संघटनशक्ती असलेले नेते आहेत. त्यामुळे त्यांनी केलेला हा गौप्यस्फोट राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. जर सुरेंद्र माने खरोखरच भाजपमध्ये दाखल झाले, तर ते ठाकरे गटासाठी रत्नागिरीत मोठं नुकसान ठरू शकतं. ठाकरे गट आधीच राज्यात अनेक नेत्यांच्या निर्गमनामुळे कमजोर होत चालला आहे. अशा वेळी रत्नागिरीसारख्या महत्वाच्या मतदारसंघात आणखी एक गळती झाली, तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का ठरेल, असा राजकीय विश्लेषकांचा दावा आहे.
Uday Samant Claims Ratnagiri Political Earthquake Uddhav Thackeray Leader Joining BJP
महत्वाच्या बातम्या
- Trump : झेलेन्स्कींना ट्रम्प म्हणाले- रशिया युक्रेनचा नाश करेल, पुतिन यांच्या अटी मान्य करा आणि युद्ध संपवा
- Chitapur Karnataka : कर्नाटकच्या चित्तपूरमध्ये RSSच्या संचलनाला परवानगी नाकारली; भीम आर्मीलाही परवानगी दिली नाही
- Bachchu Kadu : आत्महत्या करण्याऐवजी आमदारांना कापून टाका, बच्चू कडू यांचे खळबळजनक विधान, म्हणाले – मरण्यापेक्षा लढणे सुरू करा
- सत्तेच्या वळचणीला राहूनही काका – पुतण्याच्या पक्षांची पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई पट्ट्यात पडझड!!