• Download App
    UCC UCC : महाराष्ट्रातही समान नागरी कायदा, लवकरच एकत्र

    UCC : महाराष्ट्रातही समान नागरी कायदा, लवकरच एकत्र बसून निर्णय; एकनाथ शिंदेंचे सूतोवाच!!

    UCC

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : UCC उत्तराखंड राज्याने समान नागरी कायदा लागू केला. त्यापाठोपाठ गुजरात सरकारने देखील त्यांच्या राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी ड्राफ्टिंग कमिटी नेमली. त्या संदर्भात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गृहमंत्री हर्ष संघवी यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली.UCC

    या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुद्धा भाजप महायुतीचे सरकार असल्याने राज्यात समान नागरी कायदा कधी लागू होणार??, असा सवाल समोर आला. त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुलासा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आपण स्वतः आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र बसून त्यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ, असे एकनाथ शिंदे म्हणाले. त्यामुळे महाराष्ट्रात समान नागरी कायद्याच्या चर्चेला सुरुवात झाली.



    उत्तराखंडमध्ये भाजपच्या पुष्कर सिंह धामी सरकारने समान नागरी कायदा लागू केला. त्या संदर्भात स्वतंत्र यंत्रणा देखील अस्तित्वात आणून ती कार्यान्वित केली. त्या पाठोपाठ गुजरात मध्ये समान नागरी कायदा लागू करण्याची तयारी भूपेंद्र पटेल सरकारने चालवली. येत्या सहा ते आठ महिन्यांमध्ये राज्याला आवश्यक असेल अशा स्वरूपाची तरतुदी असलेला ड्राफ्ट संबंधित ड्राफ्टिंग कमिटी राज्य सरकारला सादर करेल. त्यावर विधानसभेत शिक्कामोर्तब करून गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू होईल, असे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल म्हणाले.

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील लवकरच समान नागरी कायद्यासंदर्भात महाराष्ट्राचा निर्णय घेऊ असे सूतोवाच करून त्या विषयाला महाराष्ट्रात तोंड फोडले. समान नागरी कायद्यासंदर्भामध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांची भूमिका समान आहे त्यामध्ये फारसा फरक नाही परंतु अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही मूळची काँग्रेसी संस्कृतीतला पक्ष असल्याने त्यांचा समान नागरी कायद्यासंदर्भातल्या दृष्टिकोन भिन्न आहे. परंतु, महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना या दोन हिंदुत्ववादी पक्षांचे वर्चस्व असल्याने राज्यात समान नागरी कायदा लागू करणे फारसे अवघड नाही.

    UCC : Uniform Civil Code in Maharashtra too, to sit together and decide soon; Eknath Shinde’s thread!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

    Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली – देवेंद्र फडणवीस