• Download App
    शिवसेनेतल्या सत्तेच्या वाट्यावरून सुरू झालेले भांडण काल बिन शर्टावर आले, आज तर ते चड्डीवर घसरले!! UBT shivsena and MNS targets each others over support to Modi

    शिवसेनेतल्या सत्तेच्या वाट्यावरून सुरू झालेले भांडण काल बिन शर्टावर आले, आज तर ते चड्डीवर घसरले!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेनेतल्या सत्तेच्या वाट्यावरून ठाकरे बंधूंमध्ये सुरू झालेले भांडण काल बिन शर्टावर आले, आज तर ते चड्डीवर घसरले!!

    उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त केलेल्या भाषणात राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना दिलेल्या बिनशर्त उघड पाठिंब्याची “बिन शर्ट उघडा पाठिंबा” म्हणून खिल्ली उडवली. त्यावरून मनसेने उद्धव ठाकरे यांना जनता तुमची चड्डी पण शिल्लक ठेवणार नाही, असे प्रत्युत्तर दिले. मुंबईतील माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात झालेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांनी खास आपल्या शैलीत टोला लगावला.

    UBT shivsena and MNS targets each others over support to Modi

    उद्धव ठाकरे म्हणाले, मला एका गोष्टीचा नक्कीच अभिमान आहे की, या निवडणुकीत आपण फक्त शिवसेनाप्रमुखांचा फोटो वापरला. इतर कोणाचाही फोटो लावला नाही. या निवडणुकीत आपले कोण आणि परके कोण हे कळालं. काही जणांनी फक्त उद्धव ठाकरे नको म्हणून “बिन शर्ट” पाठिंबा दिला,” असं म्हणत राज ठाकरेंना सूचक शब्दांमध्ये टोला लगावला. उघड पाठिंबा म्हणजे “बिन शर्ट…” असं उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली. तेव्हा सभागृहात टाळ्या आणि शिट्ट्या वाजल्या.

    मनसेचे प्रत्युत्तर

    उद्धव ठाकरेंनी केलेल्या या टीकेला 12 तासांमध्ये मनसेने उत्तर दिले. मनसेचे नेते तसेच वरळी मतदारंसघातून विधानसभेचे संभाव्य उमेदवार संदीप देशपांडेंनी आपल्या एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन प्रतिक्रिया नोंदवली. हिरव्या मतांच्या जोरावर यश मिळवल्यामुळे काही लोक पांचट जोक मारत आहेत, पण येणाऱ्या निवडणुकीत मराठी माणूस यांची चड्डी पण शाबूत ठेवणार नाही, अशी पोस्ट संदीप देशपांडेंनी केली.

    UBT shivsena and MNS targets each others over support to Modi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    काँग्रेसचे नेते कलमाडींना पुन्हा पक्षाच्या “सेवेत” आणू पाहताहेत, पण या नेत्यांनी गेल्या 15 वर्षांत पुण्यात केले काय??

    Sharad Pawar : पंढरपूरच्या शेतकऱ्याची शेती क्रांती, 3 किलोच्या आंब्याला शरद पवारांचे नाव!!

    Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पाकवर कडक कारवाई करणारे मोदी पहिले पंतप्रधान!