वृत्तसंस्था
पुणे : पुण्यातील दोन तरुणांनी इलेक्ट्रिक वाहन उद्योगात क्रांती घडविली आहे. दुचाकी, तीनचाकी, कार, व्यवसायिक वाहननिर्मितीचा पाया घातला असून आज पुण्यात त्यांच्या दुचाकींचे उदघाटन देखील होत आहे. Two youngsters from Pune revolutionize the electric vehicle industry; Establishing and creating a startup company; Two-wheeler launch in Pune today
रोहन कांबळे आणि श्रीकांत कांबळे, अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी फरीदाबाद येथे डेक्सटो मोटर्स या नावाची इलेक्ट्रिक वाहन निर्मिती स्टार्ट अप कंपनी सुरु केली. तेथे इलेक्ट्रिक दुचाकी, तीनचाकी, कार, व्यवसायिक वाहन निर्मितीला सुरुवात केली.
रोहन कांबळे यांनी बेळगावातून अभियांत्रिकी पदवी संपादन केल्यानंतर चीनकडे प्रयाण केले. तेथे त्यांनी इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचा अभ्यास आणि तंत्र अवगत केले. मायदेशी परतल्यावर त्यांनी इलेक्ट्रिक वाहन निर्मिती उद्योगाची पायाभरणी श्रीकांत कांबळे यांच्यासोबत सुरु केली. संपूर्ण स्वदेशी बनावटीची वाहन निर्मिती ते करत आहेत.
कंपनीने ४०० पेक्षा जास्त दुचाकी आणि तीन चाकी तयार केल्या आहेत. मार्च २०१८ मध्ये कंपनीची स्थापना झाली. विशेष म्हणजे त्यांना निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोजकर सल्लागार म्हणून लाभले आहेत. युजीसीचे माजी चेअरमन सुखदेव थोरात, उद्योगपती कल्पना सरोज, महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष विजया रहाटकर, राज्य वाहतूक संघटनेचे बाबा शिंदे, माल्टा येथील राजू भोसले यांची त्यांना सल्लागार म्हणून साथ लाभली आहे.
विशेष म्हणजे आजच गुरुवारी ( ता. २४) पुण्यात या कंपनीची इलेक्ट्रिक दुचाकी मान्यवरांच्या हस्ते सायंकाळी लॉंच होणार आहे.
Two youngsters from Pune revolutionize the electric vehicle industry; Establishing and creating a startup company; Two-wheeler launch in Pune today
महत्त्वाच्या बातम्या
- Farooq Khan Profile : 90च्या दशकात ठरले होते दहशतवाद्यांचा कर्दनकाळ, आता जम्मू-काश्मिरात भाजपचा चेहरा बनू शकतात माजी IPS फारुख खान
- ड्रॅगनच्या उचापती सुरूच : OIC मध्ये चीनने उचलला काश्मीरचा मुद्दा, भारताचा तीव्र आक्षेप, म्हटले- अंतर्गत बाबींत नाक खुपसण्याचा अधिकार नाही!
- ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला ठाकरे – पवार सरकारने पुसली पाने; महामंडळाचे विलीनीकरण नाहीच!!