विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवडणूक सुरू आहे. मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर हे दोन दिग्गज नेते एकमेकांशी टक्कर घेत आहेत. दोन्ही नेते माध्यमांना छोट्या – मोठ्या मुलाखती देत आहेत. गांधी परिवाराची काँग्रेस मधली अपरिहार्यता समजावून सांगत आहेत. गांधी परिवाराने आपला अधिकृत कौल गुलदस्त्यात ठेवला आहे. पण काँग्रेस सारख्या मोठ्या राष्ट्रीय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवडणूक असूनही महाराष्ट्रात मात्र या निवडणुकीच्या बातम्या माध्यमांमध्ये झाकोळल्या आहेत… याचे कारण शिवसेना नावाच्या दोन प्रादेशिक पक्षांच्या घमासानात दडले आहे!!Two Shivsena factions fully occupied the news space of marathi media, Congress lost its space
शिवसेनेचा ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातले राजकीय घमसान एवढे टोकाला पोहोचले आहे की त्यांच्या बातम्यांनी मराठी माध्यमांचे सगळे बातम्या विश्व व्यापून टाकले आहे. त्यामध्ये उरलीसुरली जागा काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या बातम्यांना मिळत आहे. एरवी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवडणूक एवढी गाजली असती की त्या निवडणुकीच्या बातम्यांच्या निमित्ताने इतर बातम्यांना माध्यमांमध्ये स्थानच उरले नसते.
किंवा शोधावे लागले असते. पण काँग्रेस आता काही सत्तारूढ पक्ष नाही. त्यातही गांधी परिवारापैकी कोणी अध्यक्ष पदाची निवडणूक लढवत नाही. त्यामुळे निवडणुकीतले राजकीय ग्लॅमर निम्म्यापेक्षा कमी झाले आहे. याचाही परिणाम मराठी माध्यमांमध्ये त्याच्या बातम्यांवर झाला आहे.
पण त्याहीपेक्षा मोठा परिणाम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन प्रादेशिक पक्षांच्या टकरीच्या बातम्यांचा झाला आहे. दोन्ही शिवसेनेमध्ये कुठेही खुट्ट वाजले की मराठी माध्यमे त्याच्या बातम्यांवर तुटून पडतात आणि एकापाठोपाठ एक बातम्यांचा मारा करतात. मराठी माध्यमांची सगळी बातम्यांची स्पेस याच दोन शिवसेनेने व्यापली आहे. बाकीचे पक्ष भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या पक्षांच्याही बातम्यांना पुरते स्थान मिळेनासे झाले आहे…
आणि स्थान मिळतच असेल तर शिवसेनेच्या भांडणाच्या प्रतिक्रियांच्या बातम्यांना मिळते आहे. एका अर्थाने एका शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्यानंतर तिच्या बातम्यांनी देखील तिच्या मूळ साईज पेक्षा दुप्पट जागा व्यापली आहे. आणि त्याचाच सर्वाधिक परिणाम काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या बातम्यांवर झाला आहे.
Two Shivsena factions fully occupied the news space of marathi media, Congress lost its space
महत्वाच्या बातम्या
- अनिल देशमुखांना कोर्टाचा दिलासा : खासगी रुग्णालयात अँजिओग्राफीस परवानगी, जसलोकमध्ये उपचार
- अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू : शिवसेनेच्या ऋतुजा लटके विरुद्ध भाजपचे मुरजी पटेल
- Mahakal Lok Photos : महाकाल लोकच्या कॉरिडॉरमध्ये हजारो वर्षांचा इतिहास, कारंजे आणि 50 हून अधिक भित्तीचित्रे, अशी आहे वैशिष्ट्ये