• Download App
    दारूच्या नशेत केला बॉम्ब पेरल्याचा निनावी फोन, पोलिसांनी शिताफीने केली अटक Two people arrested for hoax call

    दारूच्या नशेत केला बॉम्ब पेरल्याचा निनावी फोन, पोलिसांनी शिताफीने केली अटक

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानासह चार ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरविणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बॉम्ब पेरल्याचा निनावी फोन आल्यानंतर पोलिसांनी तातडीने त्या क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा ‘माझ्याकडे होती ती माहिती मी तुम्हाला दिली. आता मला डिस्टर्ब करू नका,’ असे सांगून समोरच्या व्यक्तीने फोन ठेवून दिला होता. त्यानंतर हा फोन बंद लागत होता. Two people arrested for hoax call



    ‘मोबाईल लोकेशन’च्या आधारे पोलिस आरोपींपर्यंत पोहोचले. राजू अंगारे आणि रमेश शिरसाट अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींतील एक जण ट्रकचालक आहे. हे दोघेही डोंबिवलीत राहणारे आहेत. या दोघांनी दारूच्या नशेत हा धमकीचा दूरध्वनी केल्याची बाब उजेडात आली आहे.

    मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भायखळा आणि दादर रेल्वे स्थानक, तसेच अमिताभ बच्चन यांचा बंगला अशा चार ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दूरध्वनी मुंबई पोलिसांना आला होता. दूरध्वनीवरून धमकी आल्यानंतर पोलिसांनी तपास मोहीम हाती घेण्यात आली. या शोध मोहिमेत ‘एटीएस’चे पथक, शीघ्र कृती दल तसेच स्थानिक पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. मात्र चारही ठिकाणी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.

    Two people arrested for hoax call

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीची दुहेरी खेळी; मुंबईत काँग्रेस बरोबर युती, पण उल्हासनगर मध्ये शिंदे सेनेबरोबर आघाडी; भाजपवर मात!!

    समाजात ज्ञानकेंद्रित शिक्षणाचा अभाव; शिक्षण व्यवस्थेचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक; भैय्याजी जोशींचे परखड मत

    Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- धर्मच मला व मोदींना चालवत आहे, जोपर्यंत धर्म भारताला मार्गदर्शन करेल, तोपर्यंत देश विश्वगुरू राहील