• Download App
    Two NCP alliance only for ZP elections, not beyond that 5 फेब्रुवारी पर्यंत पवार काका - पुतण्यांची एकी; पण केंद्रीय मंत्रिपदासाठी सुप्रिया सुळे यांचे घोडे पुढे दामटले जाताच पुन्हा बेकी!!

    5 फेब्रुवारी पर्यंत पवार काका – पुतण्यांची एकी; पण केंद्रीय मंत्रिपदासाठी सुप्रिया सुळे यांचे घोडे पुढे दामटले जाताच पुन्हा बेकी!!

    NCP alliance

    नाशिक : 5 फेब्रुवारी पर्यंत पवार काका – पुतण्यांची एकी; पण केंद्रीय मंत्रिपदासाठी सुप्रिया सुळे यांचे घोडे पुढे दामटले जाताच पुन्हा बेकी!!, अशी दोन्ही राष्ट्रवादींची अवस्था होण्याची शक्यता आहे.Two NCP alliance only for ZP elections, not beyond that

    पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांमध्ये मोठ्या राजकीय गरजेपोटी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र आघाडी करून उमेदवार उभे केले. कारण भाजप सारख्या बलाढ्य पक्षाशी त्यांना टक्कर घ्यायची होती. त्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी लाभार्थी ठरली, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अजित पवारांच्या राष्ट्रवादी पुढे शरणागती पत्करावी लागली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे फारच कमी उमेदवार उभे राहिले.



    – पटेल आणि तटकरे यांनी एकीकरण हाणून पाडले

    पण त्यामुळेच दोन्ही राष्ट्रवादींच्या एकीकरणाची माध्यमांनी चर्चा सुरू केली. त्यामध्ये सुप्रिया सुळे यांचे केंद्रीय मंत्रीपद हा विषय मध्येच पुढे आणला. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांची अस्वस्थता वाढली. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे सावध झाले आणि त्यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकीकरणाची शक्यता फेटाळून लावली. सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तर आपले राजकीय भवितव्य धोक्यात येते याची भीती प्रफुल्ल पाटील आणि सुनील तटकरे यांना वाटली म्हणूनच त्यांनी राष्ट्रवादीच्या एकीकरणाची शक्यता हाणून पाडली. अजित पवारांना सुद्धा पटेल आणि तटकरे यांच्याच मतांची री ओढावी लागली. कारण सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री आणि अजित पवार राज्यात उपमुख्यमंत्री हे राजकीय चित्र सुप्रिया सुळे यांना अनुकूल ठरले असते. सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या वरिष्ठ पातळीवर जाऊन पोहोचल्या असत्या त्यामुळे अजित पवारांनी सुद्धा एकीकरणाची शक्यता फेटाळून लावली.

    – जिल्हा परिषद निवडणुकांपुरती एकी

    पण पुणे आणि पिंपरी महापालिकेतल्या राजकीय अपरिहार्यते कोटी जी दोघा पवारांनी एकी केली, तीच एकी 5 फेब्रुवारी पर्यंत पुढे नेणे त्यांना भाग आहे कारण तोपर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत पुणे जिल्हा परिषदेत कार्यकर्त्यांच्या आग्रहासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक आघाडी करूनच निवडणूक लढवतील त्याचा निकाल जो काही लागायचा तो लागेल पण 5 फेब्रुवारी नंतर दोन्ही राष्ट्रवादी आपापल्या मार्गांनी चालायला लागतील. कारण भाजपची इच्छा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या महत्त्वाच्या नेत्यांची इच्छा या परस्परांना पूरक ठरतील. त्यात सुप्रिया सुळे यांचे राजकीय नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.

    Two NCP alliance only for ZP elections, not beyond that

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधूंच्या मराठी अजेंड्यावर सुजात आंबेडकर यांचा जोरदार प्रहार!!

    29 पैकी जास्तीत जास्त महापालिका जिंकून भाजप नंबर 1 वर राहील यात काय विशेष??; त्यापेक्षा भाजप ठाकरे, पवारांचे वर्चस्व कायमचे मोडणार का??, याला विशेष महत्त्व!!

    मुंबई महापालिकेकडे फक्त 140 PADU मशीन्स, वापरही अपवादात्मक; पण केवळ “पाडू” शब्दाला घाबरले ठाकरे!!