- मुंबईतील गोरेगाव परिसरात एनसीबीची धाड : एकाला जहाजावरील कारवाईवेळीच घेतलं होतं ताब्यात
विशेष प्रतिनिधी
मुंबई : एनसीबीने उघडकीस आणलेल्या क्रूझ जहाजावरील रेव्ह पार्टी प्रकरणात आता आणखी दोन जणांना अटक कऱण्यात आली आहे. एनसीबीने सोमवारी रात्री ही कारवाई केली. यात पार्टीत सहभागी झालेल्या व्यक्तीसह ड्रग्ज पेडलकरचा समावेश आहे. Two more arrested in drug case; Will appear before the court
मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाने कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर 2 ऑक्टोबर रोजी धाड टाकली होती. या कारवाईत एनसीबीने आठ जणांना अटक केली होती. तर काही जणांना ताब्यात घेतलं होतं.
या प्रकरणात आता आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. एनसीबीच्या पथकाने सोमवारी ही कारवाई केली. यातील एकाला क्रूझवरील कारवाईवेळी ताब्यात घेण्यात आलं होतं. तर दुसरा आरोपी ड्रग्ज पेडलर असून त्याला जोगेश्वर परिसरातून अटक करण्यात आली आहे.
एनसीबीने जोगेश्वरी परिसरात धाड टाकली होती. यावेळी ड्रग्ज पेडलरला अटक करण्यात आली. त्याच्याजवळ मेफेड्रोन ड्रग्ज सापडले. एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या दोघांना आज (5 ऑक्टोबर) न्यायालयापुढे हजर केलं जाणार आहे.
एनसीबीने रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केल्यानंतर आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. यात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश होता. चौकशी आणि वैद्यकीय चाचणी केल्यानंतर एनसीबीने आठ जणांवर अटकेची कारवाई केली.
Two more arrested in drug case; Will appear before the court
महत्त्वाच्या बातम्या
- Aryan Khan Drugs Case : शाहरुख खानच्या समर्थनार्थ आले शशी थरूर, आर्यनबद्दल म्हणाले – सहानुभूती ठेवा!
- माजी कर्मचाऱ्याचा फेसबुकवर मोठा आरोप, पैशांसाठी हेट स्पीचला चालना देते ही दिग्गज सोशल मीडिया कंपनी
- नवरात्रोत्सव २०२१ : रावणदहनाला प्रेक्षक बोलवू नका, लोकांना लाइव्ह पाहण्याची व्यवस्था करा, वाचा… गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना
- Pandora Papers Leak : सरकारने दिले चौकशीचे आदेश; आरबीआय, सीबीडीटी आणि ईडी अधिकाऱ्यांकडून संयुक्त तपास होणार
- कोरोनामुळे मृत्यू झाल्यास भरपाई : 30 दिवसांच्या आत पीडितांच्या कुटुंबीयांना 50 हजार देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश