• Download App
    दोन महिन्यानंतर कोल्हापूर, सांगली भागातील पूरग्रस्त ठिकानांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक कोल्हापुरात दाखल! स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांत झटापट | Two months after the flood, Central team has arrived in Kolhapur to study aftermath of flood

    दोन महिन्यानंतर कोल्हापूर, सांगली भागातील पूरग्रस्त ठिकानांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक कोल्हापुरात दाखल! स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांत झटापट

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली मधील पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे अधिकारी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज दाखल झाले आहे. पन्हाळगड, नरसोबावाडी आणि शिरोळ या भागामध्ये पुरामुळे प्रचंड नुकसान झाले होते. या भागाची पाहणी करण्यासाठी हे अधिकारी कोल्हापूरमध्ये येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी ऑफिसमधून मिळाली होती.

    Two months after the flood, Central team has arrived in Kolhapur to study aftermath of flood.

    पूर ओसरून गेल्यानंतर दोन महिन्यांनी केंद्रीय पाहणी समिती आल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकर्यांना नुकसानभरपाई वेळेत मिळत नसल्यामुळे यावेळी जहाल भूमिका घेतली होती.


    कोल्हापुरात नरबळीचा संशय, कापशीत ७ वर्षांच्या मुलाचा मृतदेह हळदी-कुंकू लावल्याच्या अवस्थेत घराच्या पाठीमागे आढळला


    सर्वप्रथम कोल्हापूर आणि कोल्हापूर नजीकच्या भागांमध्ये ही पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये ही पाहणी केली जाईल आणि त्यानंतर मिरजेमध्ये पाहणी केली जाईल. सांगली शहर आणि डिग्रज या गावामध्ये अधिकारी स्थानिक लोकांसोबत चर्चा करतील. सांगली जिल्ह्याचे कलेक्टर अभिजित चौधरी यांच्याकडून पूरग्रस्त भागातील परिस्थितीचे आढावा अधिकारी घेतील. तर तिन्ही जिल्ह्यांतील नगरसेवक पूरग्रस्त भागांमधील लोकांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी केंद्र सरकरकडून निधीची मागणी करतील.

    Two months after the flood, Central team has arrived in Kolhapur to study aftermath of flood

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना