पाषाण परिसरातील टेकडीवर फिरायला गेलेल्या जोडप्यास मारहाण करुन लूटणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना चतुश्रृंगी पोलिसांनी अटक केली. त्यांनी जोडप्याच्या बॅंक खात्यातून फोनपे व्दारे 76 हजाराची रक्कम वर्ग करुन घेतली होती.
प्रतिनिधी
पुणे –पाषाण परिसरातील टेकडीवर फिरायला गेलेल्या जोडप्यास मारहाण करुन लूटणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना चतुश्रृंगी पोलिसांनी अटक केली. त्यांनी जोडप्याच्या बॅंक खात्यातून फोनपे व्दारे 76 हजाराची रक्कम वर्ग करुन घेतली होती. त्यांच्यावर मराठवाड्यासह विविध जिल्हयात तब्बल 14 लूटमारीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी दिली.Two held in they Pashan hill robbery case
गणेश ऊर्फ लहु रामभाऊ चव्हाण(धंदा-मिस्तरी,रा.लोणीकंद,ता.हवेली, मुळ ता.जिंतुर जिल्हा परभणी ) आणि राजु मंजुनाथ जगताप ( धंदा-मिस्तरी ,रा. नसरापुर ता.हवेली, मुळ बिरुर,ता.कडोर,जिल्हा चिपमगळुर, कर्नाटक ) अशी अटक आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पाषाण टेकडीवरील संगणक अभियांता असलेल्या जोडप्याला मारहाण करुन लुटण्यात आले होते.
फिर्यादी व त्यांची मैत्रिण फिरुन टेकडीवर एके ठिकाणी बसले असताना तीन अनोळखी इसमांनी त्यांना हाताने व लाथा-बुक्यांनी मारहाण,दमदाटी केली. यानंतर ठार मारण्याची धमकी देवून,त्यांच्या बॅंक खात्यातून फोन-पे च्या माध्यमातून 76 हजार रुपये जबदस्तीने वर्ग करुन घेतले होते . गुन्हा दाखल झाल्यावर पथके तयार करून तपास करत असताना गणेश व राजु यांनी केल्याचे तपासांत निष्पन्न झाले.
त्यावरुन दोझांना ताब्यात घेतले .
त्यांचा गुन्हया मध्ये सहभाग निष्पन्न झाला असुन, आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर पुणे,जालना,नाशिक,पुणे ग्रामिण,अहमदनगर,येथील वेगवेगळया पोलीस स्टेशनमध्ये दरोडा,जबरी चोरीचे असे एकुण 14 गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपी हे सध्या पोलीस कोठडीत असुन पुढील तपास सुरु आहे. पुणे शहरालगत असणारे टेकडीवर फिरायला जाणारे नागरीकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.
पोलीस उप-आयुक्त रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त,रमेश गलांडे यांचे मार्गदशनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक,राजकुमार वाघचवरे, पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक संतोष कोळी, उप निरीक्षक मोहनदास जाधव, अंमलदार, सुधाकर माने,आव्हाड, ज्ञानेश्वर मुळे, दिनेश गडाकुंश, तेजस चोपडे ,मुकुंद तारू, इरफान मोमीन, भाऊराव वारे, बाबा दांगडे,बाबुलाल तांदळे यांनी केली आहे.
आरोपींनी जोडप्याला जबर मारहाण केली होती. यानंतर त्यांनी तरुणीचा मोबाईल फोडला तर तरुणाचा मोबाईल फेकून दिला होता. पोलिसांनी दुसऱ्या दिवशी सर्च ऑपरेशन राबवले तेव्हा त्यांना फिर्यादी तरुणाचा मोबाईल सापडला.त्यातून पैसे वर्ग करण्यात आलेल्या यूपीआय खात्याचा नंबर मिळाला. मात्र बॅंका सलग तीन दिवस बंद असल्याने आरोपीची माहिती मिळू शकली नाही. बॅंक उघडल्यावर आरोपी गणेशच्या खात्याची माहिती मिळताच त्याला ताब्यात घेण्यात आले.