विशेष प्रतिनिधी
अहमदनगर – गेल्या काही दिवसांपासून वातावरणात लक्षणीय बदल होत आहे. याचा कांद्यावर प्रतिकूल परिणाम होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. अशा परिस्थितीत संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावा अंतर्गत असलेल्या आनंदवाडीतील शेतकऱ्याने वैतागून तब्बल दोन एकर क्षेत्रावरील लाल कांद्याच्या शेतात मेंढ्या सोडल्या आहेत. Two acres of onion Sheep left in the field
वातावरणातील बदलांचा सिलसिला कायमच राहिल्याने जवळपास एक लाख रुपये खर्च केलेल्या कांद्यावर प्रतिकूल परिणाम झाला. यातून हाती काहीच शिल्लक राहणार नसल्याने अखेर वैतागून किमान मुक्या जीवांना तरी चारा होईल म्हणून मुरलीधर सरोदे यांनी दोन एकर कांद्यामध्ये मेंढ्या सोडून दिल्या आहेत. एकामागून एक संकटांनी शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडले असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.
- दोन एकर कांद्याच्या शेतात सोडल्या मेंढ्या
- एक लाख खर्च केलेल्या कांद्यावर प्रतिकूल परिणाम
- पिकाचे नुकसान होण्याची मोठी धास्ती
- किमान आता मेंढ्याना चारा मिळावा हा उद्देश
Two acres of onion Sheep left in the field
महत्त्वाच्या बातम्या
- आनंदाची बातमी : कोरोना बरा करणारी गोळी आली, ५ दिवसांचा कोर्स; किंमत किती आणि कुठून कराल खरेदी? वाचा सविस्तर
- बिग बींच्या घरात कोरोना : अमिताभ बच्चन यांच्या घरातील कर्मचाऱ्याला लागण; ३१ कर्मचाऱ्यांचे नमुने तपासणीला पाठवले
- PM मोदींची फिरोजपूरमध्ये सभा : शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित, आता १५ मार्चला पंतप्रधान भेटणार शेतकऱ्यांना