• Download App
    क्रांतिज्योती सावित्रीबाईंची बदनामी करणाऱ्या भारद्वाज स्पीक्सचा बिनशर्त माफीनामा; फडणवीसांनी दिला होता कारवाईचा इशारा!! Twitter handle apologises for ‘defaming’ Phule: 'Don't deserve to be lynched'

    क्रांतिज्योती सावित्रीबाईंची बदनामी करणाऱ्या भारद्वाज स्पीक्सचा बिनशर्त माफीनामा; फडणवीसांनी दिला होता कारवाईचा इशारा!!

    प्रतिनिधी

    मुंबई : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची बदनामी करणाऱ्या भारद्वाज स्पीक्सने अखेर बिनशर्त माफीनामा सादर केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभेत त्यासंदर्भात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिल्याबरोबर भारद्वाज स्पीक्सने आपल्या ट्विटर हँडलवर बिनशर्त माफीनामा सादर केला. Twitter handle apologises for ‘defaming’ Phule: ‘Don’t deserve to be lynched’

    क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भात भारद्वाज स्पीक्सने ट्विटर हँडलवर बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केला होता. त्याची लिंक इंडिक टेल्स आणि हिंदू पोस्ट तुझ्या दोन पोर्टलने देऊन सावित्रीबाईंची बदनामी केली होती.

    या संदर्भात महाराष्ट्र विधानसभेत विरोधकांनी संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली होती. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले अथवा कोणत्याही महापुरुषाची बदनामी करणाऱ्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे, असे जळजळीत उद्गार काढले होते. परंतु कायद्याच्या चौकटीत राहून आपल्याला कारवाई करावी लागते. त्यामुळे संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करू, अशी ग्वाही फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती.

    त्यानंतर भारद्वाज स्पीक्सने आपल्या ट्विटर हँडलवर बिनशर्त माफीनामा सादर केला आहे. इंडिक टेल्स आणि हिंदू पोस्ट यांना आपल्या ट्विटर हँडल वरचा हँडलची लिंक शेअर करण्याची परवानगी आपण दिली नव्हती. आपण सावित्रीबाई विषयी लिहिले जे लिहिले होते, ते पुढचा मागचा विचार न करता या दोन्ही वेब पोर्टलनी छापले, असा दावा भारद्वाज स्पीक्सने केला आहे. त्याच वेळी आपण बिनशर्त माफी मागतो, असेही भारद्वाज स्पीक्सने ट्विटर हँडल वर लिहिले आहे.

    Twitter handle apologises for ‘defaming’ Phule: ‘Don’t deserve to be lynched’

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस