• Download App
    पवारांच्या पक्षाच्या तुतारी चिन्हाचे उद्या रायगडावर अनावरण; पण तुतारी वाजेल की हवा निघेल??; भाजप खासदाराने डिवचले!! Tutari symbol of Pawar's party to be unveiled at Raigad tomorrow

    पवारांच्या पक्षाच्या तुतारी चिन्हाचे उद्या रायगडावर अनावरण; पण तुतारी वाजेल की हवा निघेल??; भाजप खासदाराने डिवचले!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : निवडणूक आयोगाने “राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार” या पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे पक्ष चिन्ह दिले. त्याचे उद्या रायगडावर भव्य कार्यक्रमात अनावरण होणार आहे. शरद पवारांसह त्यांचे हजारो समर्थक नेते आणि कार्यकर्ते रायगडावर जमणार आहेत. Tutari symbol of Pawar’s party to be unveiled at Raigad tomorrow

    शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाला निवडणूक चिन्हांचे 3 पर्याय दिले होते, पण यात तुतारी चिन्हाचा पर्याय दिला नव्हता, तरी निवडणूक आयोगाने त्यांना तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले. त्यावर “वाजवा तुतारी, गाडा गद्दारी!!” असे ट्विट जितेंद्र आव्हाडांनी केले, पण फुंकली तुतारी, वाजली पिपाणी!!, तुतारी वाजेल की हवा निघेल??, अशा शब्दांमध्ये भाजप खासदारासह अनेकांनी सोशल मीडियावर तुतारी चिन्हाची खिल्ली उडवली.

    “मशाली घ्या. तुतारी वाजवा, हवे तर त्यांना नव्या तुतारी देखील घेऊन देऊ. मात्र, आता तुतारी वाजेल की हवा निघेल हे पहावे लागेल, असे म्हणत भाजप खासदार सुजय विखे पाटलांनी शरद पवार गटाला डिवचले.

    सुजय विखे म्हणाले, चिन्ह देणे हा निवडणूक आयोगाचा निर्णय होता. आयोगाने चिन्ह वाटप केले आहे, पण अजूनही दुसऱ्या चिन्हावर आक्षेप घेतले आहेत. मशालीवर आक्षेप घेण्यात आला आहे, त्यामुळे जो पर्यत बॅलेटवर चिन्ह येत नाही तो पर्यंत चिन्हावर चर्चा करण्यात काय अर्थ नाही, असे सुजय विखे पाटील म्हणाले.

    ‘सेटिंग करून सगळा मलिदा हेच खात होते’

    हर घर जल हीच भाजपची निवडणूकीची टॅग लाईन असावी, अशी टीका करत आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली होती. सोबत भाजप पदाधिकारी ठेकेदारांना खंडणी मागतात, असा आरोप त्यांनी केला होता. या टीकेला उत्तर देताना सुजय विखे म्हणाले, महाविकास आघाडीच्या काळातच जलजीवन योजनेचे टेंडर झाले होते. या टेंडरमध्ये सगळे ठेकेदार यांचेच आहे, यांनी त्या काळामध्ये सेटिंग करून सगळा मलिदा हेच खात होते. आता सगळा हिशोब कोलमडल्यामुळे हे आरोप करायला लागले आहेत, असे सुजय विखेंनी सांगितले.

    मनोहर जोशींमुळेच राधाकृष्ण विखे शिवसेनेत गेले होते

    राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनावर सुजय विखेंनी शोक व्यक्त केलाय. मनोहर जोशींमुळेच राधाकृष्ण विखे शिवसेनेत गेले होते त्यांचे आणि विखे कुटुंबियांचे चांगले ऋणानुबंध होते. मनोहर जोशी यांनी महाराष्ट्रासाठीचे जे स्वप्न पाहिले होते, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार पूर्ण करेल, असे सुजय विखेंनी म्हटले.

    Tutari symbol of Pawar’s party to be unveiled at Raigad tomorrow

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!