विशेष प्रतिनिधी
नंदुरबार : जिल्हातील सारंगखेडा येथील यात्रा घोडे बाजारासाठी प्रसिद्ध आहे .या यात्रेला दत्त जयंतीपासून सुरुवात होत असून १५ दिवस ही यात्रा सुरू आहे.Turnover of crores of rupees from horse sales The famous Sarangkheda Yatra begins for the horse market
जुन्या राज – राजेवड्याचा काळापासून जातीवंत घोड्याच्या खरेदी विक्रीसाठी सारंगखेडा येथील यात्रा संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे . या अश्व बाजाराला देश भरातून अश्व प्रेमी दाखल होत असतात .या घोडे बाजारातून करोडोची उलाढाल होत असते.
गेल्या वर्षी कोरोना मुळे शासनाने सारंगखेडा यात्रेला परवानगी दिली नव्हती या वर्षी कोरोना मुळे व शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार फक्त घोडे बाजाराला परवानगी देण्यात आली आहे.
या वर्षी आता पर्यंत १५०० च्या जवळपास घोडे दाखल झाले आहे .यात काठेवाड ,मारवाड, सिंधी,पंजाब अश्या विविध जातीचे घोडे दाखल झाले आहेत . ही यात्रा दत्त पासून सुरु झाली असून 28 डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे.असे चेतक फेस्टिवल चे अध्यक्ष जयपाल सिंग रावल यांनी सांगितले.
Turnover of crores of rupees from horse sales The famous Sarangkheda Yatra begins for the horse market
महत्त्वाच्या बातम्या
- फेरीवाले, विक्रेतेही आत्मनिर्भर, केंद्र सरकारकडून ३०.७५ लाख कर्जांना मंजुरी
- उत्तर प्रदेशातील रस्ते अमेरिकेप्रमाणे बनविणार, आपले बोलणे काळ्या दगडावरची रेष असल्याचा नितीन गडकरी यांचा विश्वास
- ओमायक्रॉनचा कहर, नेदरलॅँडमध्ये लॉकडाऊन जाहीर
- Shiv sena in UPA? : पवारांच्या नेतृत्वाची बळकटी?, की उद्धव – सोनिया राजकीय नजीकतेची नांदी…??