सध्या सुरू असलेल्या ईडी कारवायांचा फायदा घेत पुण्यातील प्रसिद्ध सराफी व्यावसायिक सौरभ गाडगीळ यांना इनकम टॅक्स आणि ईडी कारवाईची भीती दाखवत 50 लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करण्यात आला. Attempt to extort Rs 50 lakh from Saurabh Gadgil out of fear of ED
विशेष प्रतिनिधी
पुणे : सध्या सुरू असलेल्या ईडी कारवायांचा फायदा घेत पुण्यातील प्रसिद्ध सराफी व्यावसायिक सौरभ गाडगीळ यांना इनकम टॅक्स आणि ईडी कारवाईची भीती दाखवत 50 लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करण्यात आला.
अमित मीरचंदानी, रुपेश चौधरी, विकास भल्ला, संतोष राठोड अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सौरभ विद्याधर गाडगीळ (वय 43) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक शैलेश संख्ये यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडगीळ यांच्या पीएनजी ग्रुप मधील एका कंपनीने डीएचएफएल या कंपनीकडून कर्ज घेतले होते.
या कर्ज प्रकरणात आर्थिक घोटाळा झाल्याचा बनाव आरोपींनी रचला. या प्रकरणात प्राप्तिकर विभागाने आक्षेप घेतला असून त्यामध्ये ईडी आणि ‘एसएफआयओ’ यांनी त्रुटी काढल्याचे सांगितले. प्राप्तिकर विभाग आणि ईडीकडून या प्रकरणाची दखल घेतली गेल्याचे चित्र आरोपींनी निर्माण केले.
आरोपी विकास भला याने दिल्लीमधील अधिकारी माझ्या ओळखीचे आहेत. ते पुण्यामध्ये आलेले असून या कर्ज प्रकरणाची केस त्यांच्याकडे प्रलंबित आहे असे सांगत भीती घातली. हे प्रकरण मिटवून देतो असे सांगितले. तसेच रुपेश चौधरी याने गाडगीळ यांना बघून घेण्याची धमकी दिली. या सर्वांनी प्रकरण सेटल करण्याकरिता गाडगीळ यांच्याकडे 50 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली.
Attempt to extort Rs 50 lakh from Saurabh Gadgil out of fear of ED
महत्त्वाच्या बातम्या
- प्रवाशांनो सावधान ! मास्क घातला नाही तर भरावा लागल ५०० रुपये दंड, रेल्वे मंत्र्याने जाहीर केले कडक नियम
- Uk on covishield : ११ ऑक्टोबरपासून कोव्हिशिल्ड घेतलेल्या भारतीयांचे क्वारंटाइन बंद ; ब्रिटिश उच्चायुक्त एलिस यांनी केले ट्विट
- मनी मॅटर्स : नॅशनल पेन्शन सिस्टिम हा सुरक्षित गुंतवणूक पर्याय
- विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : संगणकाचे काम चालते तरी कसे?