प्रतिनिधी
मुंबई : आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्यासाठी एक विशिष्ट जमाव मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र झाल्याच्या कथित घटनेसंदर्भात एफआयआर नोंदवून अत्यंत कडक कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने ही माहिती दिली आहे.Tribakeshwar mandir Intrusion incidents, devendra fadnavis orders stringent legal action and forming police SIT for inquiry
या घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत एसआयटी स्थापन करण्याचे सुद्धा आदेश दिले आहेत.
ही एसआयटी केवळ यावर्षीच्या घटनेची चौकशी करणार नाही, तर गेल्या वर्षीच्या घटनेचीही चौकशी करेल, ज्यावेळी एक विशिष्ट जमाव त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये शिरल्याची कथित घटना घडली होती.
या संदर्भातली माहिती अशी
स्थानिक संदलच्या मिरवणुकीतील काही युवकांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात त्रंबकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट आणि ब्राह्मण महासंघ, किर्तन कुल यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टच्या घटनेनुसार हिंदू धर्मीय सोडून अन्य धर्मियांना मंदिरात प्रवेश नाही. दर्शन अधिकार नाहीत. तरी देखील स्थानिक संदलच्या मिरवणुकीतील इतर धर्मीय लोकांनी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर महाद्वारातून आत मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. तेथे सुरक्षारक्षकांनी त्यांना अडविले. मात्र या युवकांनी सुरक्षारक्षकांची हुज्जत घालून मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला.
13 मे रोजी रात्री 9:45 च्या सुमारास झालेला हा घुसखोरीचा प्रकार म्हणजे सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न आहे. सबब या संदर्भात योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी विनंती त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट समितीने पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रार अर्जात केली आहे. त्र्यंबकेश्वर मधील अखिल भारतीय कीर्तन कुल संस्थेने देखील याच आशयाचा अर्ज पोलीस स्टेशन मध्ये केला आहे.
Tribakeshwar mandir Intrusion incidents, devendra fadnavis orders stringent legal action and forming police SIT for inquiry
महत्वाच्या बातम्या
- कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा आज शक्य, काँग्रेस निरीक्षकांनी खरगे यांना अहवाल सादर केला; डीके शिवकुमार आज दिल्लीला जाणार
- आमच्या सरकारने भ्रष्टाचाराचे सर्व रेकॉर्ड मोडले, राजस्थानच्या काँग्रेस मंत्र्यांचा मुख्यमंत्री गेहलोत यांच्यावर खळबळजनक आरोप
- पाकिस्तानच्या कोळसा खाणीत हद्दवाढीवरून वाद विकोपाला, रक्तरंजित संघर्षात तब्बल 16 जणांचा मृत्यू
- प्रशांत किशोर यांचा काँग्रेसला सल्ला, जास्त खुश होऊ नका, 2013 मध्ये विजयी होऊनही 2014 मध्ये पराभूत झाला होता