शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोलीतील साई रिसॉर्टची चौकशी करण्याचे आदेश रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. माजी खासदार किरिट सोमय्या यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. यापूर्वी सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन परब यांच्या रिसॉर्टबाबत तक्रार केली होती.Transport Minister Anil Parab’s Dapoli resort will be investigated, the district collector has ordered
विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोलीतील साई रिसॉर्टची चौकशी करण्याचे आदेश रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
माजी खासदार किरिट सोमय्या यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. यापूर्वी सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन परब यांच्या रिसॉर्टबाबत तक्रार केली होती.
अनिल परब दापोली साई रिसॉर्ट घोटाळाची चौकशी करण्याचे आदेश रत्नागिरी जिलाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे, असे ट्विट सोमय्या यांनी केले आहे.
अनिल देशमुख यांच्यानंतर आता अनिल परब यांचा नंबर लागणार आहे. परब केवळ दोन महिन्यांचेच पाहुणे आहेत. परब यांच्यावर वेगवेगळ्या घोटाळ्याचे आरोप आहेत.
या सगळ्या घोटाळ्यांची विविध यंत्रणांमार्फत चौकशी सुरू असून राज्यपालांनीही परब यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे परब हे आता 2 महिन्यांचे पाहुणे असून सरकारनेच आता त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.
किरीट सोमय्या यांनी याबाबत केलेल्या तक्रारीत म्हटले होते की दापोली जवळील मुरुड समुद्र किनाºयावर लॉकडाऊनच्या काळात म्हणजेच २०२० मध्ये अनिल परब यांनी आलिशान साई रिसॉर्ट बांधलं.
जून २०१९ मध्ये अनिल परब यांनी जमीन घेतली. मात्र, सात बारा नावावर केलेला नाही आहे. तसंच २०२० मध्ये ठाकरे सरकारच्या अधिकारांचा दुरुपयोग करुन सगळे नियम धाब्यावर बसवून समुद्र किनाऱ्यांवर आलिशान रिसॉर्ट बांधला.
रिसॉर्ट बांधून झाल्यावर अनिल परब यांनी ते रिसॉर्ट २९ फेब्रुवारी २०२१ मध्ये त्यांचे भागीदार आणि शिवसेना नेते सदानंद कदम यांच्या नावावर केला.
Transport Minister Anil Parab’s Dapoli resort will be investigated, the district collector has ordered
महत्त्वाच्या बातम्या
- नेस्लेची उत्पादने नाहीत हेल्दी, कंपनीच्याच अहवालात आरोग्यपूर्ण नसल्याचे आले दिसून
- अमर्त्य सेन यांनीच घेतला भारतरत्नचा अर्थलाभ, चार वर्षांत २१ वेळा मोफत विमानप्रवास, माहिती अधिकारात झाले उघड
- राहूल, प्रियंकाच्या लसीबाबतच्या भूमिकेवर कॉँग्रेस नेते शशी थरुर यांचेच प्रश्नचिन्ह, आता लस इतर देशांना का देत नाही असा सरकारला केला सवाल
- मोदींना घायाळ करणारी 6 वर्षांच्या ‘काश्मिरी कळी’ची गोड गळ
- बौद्ध विद्येतील योगदानाबद्दल पुण्यातल्या भांडारकर इन्स्टिट्यूटचा सन्मान संस्थेचा