विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) नोटीस पाठविल्याने महाविकास आघाडीचे दुसरे कॅबिनेट मंत्री ‘ईडी’च्या रडारवर आले आहेत.Transport Miinster Anil Parab On ED’s radar
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ अनिल परब यांना ईडीची नोटीस आल्याने महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. नारायण राणे यांच्या अटकेत अनिल परब यांची मोठी भूमिका होती. त्यामुळे परब यांना ईडीची नोटीस आल्यानंतर पुन्हा राज्यातील वातावरण तापण्याच्या शक्यता आहे.
ईडीच्या नोटीसबद्दल अनिल परब म्हणाले की, ‘कशाबद्दल बोलावण्यात आले आहे, याबाबत ईडीच्या नोटिशीमध्ये सविस्तर उल्लेख करण्यात आलेला नाही. त्याची माहिती घेऊन त्या नोटिशीला कायदेशीर उत्तर देण्यात येईल.
दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘शाब्बास ! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षेप्रमाणे अनिल परब यांना ‘ईडी’ची नोटीस बजावण्यात आली,’ असे ट्विट करत ही माहिती दिली. ‘ईडी’कडून अनिल परब यांना नोटीस बजावली गेली असून त्यांना ३१ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.
लबाड लांडग ढोंग करतय का ?
दरम्यान, १०० कोटींच्या वसुली प्रकरणात अनिल परब यांना समन्स बजावल्याचे सांगण्यात येत आहे. १०० कोटींच्या वसुलीमध्ये अनिल देशमुख यांच्यासह अनिल परब यांच्याही नावाचा उल्लेख असल्याने ही कारवाई केल्याचे समजते.
- अनिल परब यांना ‘ईडी’ने बजावली नोटीस
- महाविकास आघाडीला आणखी एक धक्का
- राज्यातील दुसरे कॅबिनेट मंत्री रडारवर
- अनिल देशमुख यांच्यानंतर अनिल परब यांचे नाव
- १०० कोटी वसुलीमध्ये प्रकरणात हात ?
- उद्या हजर राहण्याचे अनिल परब यांना आदेश
Transport Miinster Anil Parab On ED’s radar