• Download App
    जळगावात ट्रेनिंग एयरक्राफ्टचा अपघात, एक जण ठार, ज्योतिरादित्य सिंधियांनी व्यक्त केले दु:ख । Training aircraft crashes in Jalgaon, one killed, Jyotiraditya Scindia expresses grief

    जळगावात ट्रेनिंग एयरक्राफ्टचा अपघात, एक जण ठार, ज्योतिरादित्य सिंधियांनी व्यक्त केले दु:ख

    Training aircraft crashes in Jalgaon : शुक्रवारी जळगाव येथे ट्रेनिंग हेलिकॉप्टर कोसळल्याने एका उड्डाण प्रशिक्षकाचा मृत्यू झाला, तर दुसरी महिला प्रशिक्षणार्थी गंभीर जखमी झाली. पोलीस आणि स्थानिक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे एका शेतात दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हेलिकॉप्टर कोसळले. चोपड्याचे तहसीलदार व पोलीस अधिकारी घटनास्थळी हजर असून मदत व बचावकार्य चालू आहे. Training aircraft crashes in Jalgaon, one killed, Jyotiraditya Scindia expresses grief


    वृत्तसंस्था

    जळगाव : शुक्रवारी जळगाव येथे ट्रेनिंग हेलिकॉप्टर कोसळल्याने एका उड्डाण प्रशिक्षकाचा मृत्यू झाला, तर दुसरी महिला प्रशिक्षणार्थी गंभीर जखमी झाली. पोलीस आणि स्थानिक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे एका शेतात दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हेलिकॉप्टर कोसळले. चोपड्याचे तहसीलदार व पोलीस अधिकारी घटनास्थळी हजर असून मदत व बचावकार्य चालू आहे.

    हे विमान NAMIMS अकादमीचे आहे. नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करून म्हटले की, महाराष्ट्रातील एनएएमआयएमएस अकादमी ऑफ एव्हिएशनच्या एअरक्राफ्टच्या अपघातामुळे धक्का बसला आहे. घटनास्थळी तपासणी पथक पोहोचत आहे. ते पुढे म्हणाले की, दुर्दैवाने आम्ही एक फ्लाइट इंस्ट्रक्टर गमावला आहे, तर ट्रेनी गंभीर जखमी आहे. शोकाकुल कुटुंबीयांसाठी मनःपूर्वक संवेदना आणि जखमी ट्रेनी लवकर होण्यासाठी प्रार्थना करतो.

    जळगाव एसपींच्या माहितीनुसार, धुळे शिरपूरमध्ये खासगी एव्हिएशन अकादमी आहे. प्राथमिक माहितीनुसार, हे त्यांचेच हेलिकॉप्टर आहे. यात एका पायलटचा मृत्यू झाला, तर दुसरी महिला पायलट जखमी झाल्याचे वृत्त आहे. मदत व बचाव करण्याचे काम चालू आहे.

    Training aircraft crashes in Jalgaon, one killed, Jyotiraditya Scindia expresses grief

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!