विशेष प्रतिनिधी
धुळे : शिरपूर तालुक्यातील जैतपुर परिसरातील १२ मोर मृत्युमुखी डल्याची घटना गुरुवारी सकाळी ११ वाजता उघडकीस आली आहे. शिरपूर तालुक्यात प्रथमच मोठ्या संख्येने मोरांचा मृत्यू झाल्याने वन्य प्राणी मित्रांमध्ये हळहळ तर वन विभागात खळबळ उडाली आहे. Tragic death of twelve peacocks in Jaitpur area
जैतपुर परिसरात बागायती क्षेत्र जास्त आहे.तसेच बारमाही पिके जास्त प्रमाणात घेतल्याने अन्न व पाणी मुबलक आहे. या परिसरात अनेक मोर वास्तव्यात आहेत.सध्या खरीपाचा हंगाम सुरू झाल्याने शेत शिवारात कापूस व इतर पिकांची पेरणी करण्यात आली आहे. पेरण्या किंवा बिया लावण्याअगोदर रोप, बियाण्याला विषारी औषध लावण्यात येते.तेच बियाणे मोरांनी उकरून खाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
वनविभागाचे हिसाळे, वनपाल कपिल पाटील, वनरक्षक मुकेश गुजर,वन्य प्राणीमित्र योगेश वारुळे अभिजित पाटील,महेश करंकाळ आदी अधिकारी व कार्यकर्ते यांनी पाहणी केली. तर पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.उमेश बारी,पशु सहाय्यक डॉ. दिलीप गोरे यांनी तपासणी करून अन्नातून विषबाधा झाल्याचे प्रथदर्शनी सांगितले आहे.
- बारा मोरांचा जैतपूर परिसरात दुर्दैवी मृत्यू
- प्राणी मित्रांमध्ये हळहळ तर वन विभागात खळबळ
- शेतातील विषारी बिया खाल्ल्याचा अंदाज
- अन्नातून विषबाधा झाल्याचे प्रथदर्शनी स्पष्ट
- अन्न व पाणी मुबलक आल्याने मोरांचा वावर
Tragic death of twelve peacocks in Jaitpur area
महत्त्वाच्या बातम्या
- बंगालचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात वादळी होण्याची शक्यता, ममता सरकारने दिलेले अभिभाषण वाचण्यास राज्यपालांचा नकार
- मुंबईत आणखी एक बनावट कोरोना लसीकरण शिबीर उघडकीस, पाच जणांना अटक
- Job In Barti : बार्टीमध्ये शासकीय सेवेअंतर्गत प्रतिनियुक्तीने पदभरती, दहा पदांसाठी मागवण्यात आले अर्ज
- Anganwadi Sevika Recruitment 2021 : सातवी उत्तीर्ण महिलांसाठी सुवर्णसंधी, बाल विकास प्रकल्प जालनामार्फत अंगणवाडी सेविकांची भरती; 9 जुलैपर्यंत करा अर्ज
- Sputnik Light : रशियाच्या स्पुतनिक लाइट सिंगल डोस लसीला तातडीची मंजुरी नाकारली, औषध नियामकांनी फेज-3 चाचणीचा डेटा मागितला