विशेष प्रतिनिधी
मुंबई : लॉकडाउनमुळे मेअखेरपर्यंत राज्यातील सर्व व्यापाऱ्यांचे मिळून ७० हजार कोटींपर्यंत नुकसान होणार आहे. हे मोठे नुकसान ळण्यासाठी एक जूनपासून राज्यातील सर्व दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी.’’ अशी मागणी व्यापाऱ्यांच्या संघटनेने केली आहे. traders demand to govt. that open shops from june
फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष वीरेन शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ई-मेलद्वारे ही मागणी केली आहे. लॉकडाउनमुळे मेअखेरपर्यंत राज्यातील सर्व व्यापाऱ्यांचे मिळून ७० हजार कोटींपर्यंत नुकसान होणार आहे.
जूननंतरही दुकाने बंद ठेवली तर हा तोटा गणितीय श्रेणीत वाढत जाईल. ते टाळण्यासाठी अत्यावश्यक तसेच बिगर अत्यावश्यक सेवेची अशी सर्व दुकाने पूर्णवेळ खुली करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
दुकाने खुली केल्यावर सोशल डिस्टन्सिंग व अन्य आरोग्यविषयक निर्बंध पाळतच होतो व आताही निर्बंध पाळले जातीलच. त्यामुळे निदान बिगर अत्यावश्यक दुकाने रोज काही काळ तरी उघडू द्यावीत. आता मुंबईतील व राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने हळूहळू निर्बंध शिथिल करण्याची वेळ आली आहे, असेही शहा यांनी म्हटले आहे.