नाशिक : हिंदी सक्तीला विरोध आणि मराठीचे प्रेम उफाळले, या दोन मुद्द्यांवर फडणवीस सरकार आणि ठाकरे बंधू यांच्या धुमश्चक्रीत काँग्रेस पडली बाजूला, पवारांच्या राष्ट्रवादीलाही कुणी विचारेना!!, अशी अवस्था दोन्ही पक्षांची झाली.Tough fight between Thackrey brothers and BJP; Congress and Sharad Pawar NCP swayed away
राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या विरोधातला मुद्दा तापवला. त्यात उद्धव ठाकरेंनी उडी घेतली. ठाकरे बंधूंच्या पक्षांमधल्या बऱ्याच नेत्यांनी बंधू ऐक्यासाठी रेटा लावला. दोघांचेही अस्तित्व धोक्यात आल्याने दोन्ही बंधूंनी हा प्रस्ताव स्वीकारला दोघांनी एकत्र मोर्चा काढायचा निर्णय घेतला पण फडणवीस सरकारने हिंदी सक्तीचा अध्यादेश मागे घेऊन ठाकरे बंधूंना फाऊल करण्याचा डाव खेळला. पण हा डाव फारसा यशस्वी झाला नाही. कारण ठाकरे बंधूंनी मोर्चा रद्द करून एकत्र विजय साजरा करायचे ठरवले तसे जाहीर देखील केले. शिवसेना आणि मनसेने वातावरण निर्मिती चालवली.
काँग्रेस राष्ट्रवादीचा मोडला पापड
या सगळ्यांमध्ये शरद पवारांनी उभा केलेला महाविकास आघाडी नावाचा डोलारा धाडकन कोसळला. ठाकरे बंधू आणि भाजप महायुती सरकार यांच्यातल्या धुवा धुवीमध्ये काँग्रेस पडली बाजूला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला कुणी विचारेना, अशी अवस्था येऊन ठेपली. ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्यासाठी सगळ्या महाराष्ट्राला निमंत्रण दिले गेले, ठाकरे बंधूंच्या सह्यांची निमंत्रणे सगळ्यांनी जाहिरात करून छापली. पण कुणालाही वैयक्तिक निमंत्रण देणार नाही, असे संजय राऊत यांनी जाहीर केले. हा राजकीय इव्हेंट नाही मराठी माणसाचा विजय आहे. त्यामुळे कुणालाही वैयक्तिक निमंत्रण देता येणार नाही, पण सगळ्यांनी मिळाव्याला यावे, असे आवाहन संजय राऊत यांनी केले. पण त्यामुळे काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पापड मोडला.
ठाकरे बंधूंचा वैयक्तिक इव्हेंट
वास्तविक हिंदी सक्तीच्या विरोधात महाविकास आघाडीतले पक्ष म्हणजे उबाठा शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि मनसे मोठमोठ्याने बोलत होते. भाजप महायुती सरकार विरोधातल्या मोर्चासाठी एकत्र यायचे देखील त्यांनी ठरविले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते त्यामध्ये सामील होणार होते. परंतु फडणवीस सरकारने अध्यादेश मागे घेतला आणि सगळे मूसळ केरात गेले. हिंदी सक्तीविरोधातला मोर्चा बारगळला, तरी ठाकरे बंधूंनी एकीकरणासाठी मराठीचा विजय महोत्सव साजरा करायचा ठरविला. पण तो त्यांचा कौटुंबिक आणि राजकीय सोहळा झाला. हे पाहून काँग्रेसचे नेते बिथरले. त्यांनी आम्हाला निमंत्रणच दिले नाही. तो ठाकरे बंधूंचा वैयक्तिक इव्हेंट आहे. त्यामुळे आम्ही तिकडे जाणार नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी जाहीर केले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोर्चाचे निमंत्रण होते, पण ठाकरे बंधूंच्या ऐक्यामध्ये मूळातच पवारांना राजकीय धोका उत्पन्न होणार असल्याने त्यांचेही नेते तिकडे फिरकणार नसल्याचे जाहीर न करताच सगळ्यांना समजले.
Tough fight between Thackrey brothers and BJP; Congress and Sharad Pawar NCP swayed away
महत्वाच्या बातम्या
- QUAD : दहशतवाद माजवणाऱ्यांना आणि दहशतवाद पीडितांना एकाच तागडीत तोलू नका; जयशंकर यांनी अमेरिकन परराष्ट्र मंत्र्यांना सुनावले
- Indore High Court : मध्यप्रदेशातील 75 विद्यार्थ्यांसाठी पुन्हा नीट-यूजी परीक्षा होणार; इंदूर हायकोर्टाचा NTA ला आदेश
- Kolkata Law College : कोलकाता लॉ कॉलेज सामूहिक बलात्कार प्रकरण : दोन दिवस आधीच रचला होता कट, आरोपींची योजना तपासात उघड
- Ravindra Chavan भाजपा हीच माझी ओळख म्हणणारे रवींद्र चव्हाण महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी!!