• Download App
    Top performance of officers and employees from Solapur, Pune, Nagpur, Sambhajinagar in the Sevakarmi Plus program in Maharashtra महाराष्ट्रात सेवाकर्मी प्लस कार्यक्रमात सोलापूर, पुणे, नागपूर, संभाजीनगर मधल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अव्वल कामगिरी

    महाराष्ट्रात सेवाकर्मी प्लस कार्यक्रमात सोलापूर, पुणे, नागपूर, संभाजीनगर मधल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अव्वल कामगिरी

    Sevakarmi Plus

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : विकसित महाराष्ट्र 2047 कडे वाटचाल करीत असताना पारदर्शक, गतिमान आणि उत्तरदायी सुशासनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रगतीचे मूल्यांकन करण्याच्या उद्देशाने 150 दिवसांचा सेवाकर्मी प्लस कार्यक्रम राबविण्यात आला.Top performance of officers and employees from Solapur, Pune, Nagpur, Sambhajinagar in the Sevakarmi Plus program in Maharashtra

    या कार्यक्रमाचे मूल्यमापन करताना संबंधित आस्थापनाचा आकृतिबंध, सेवाप्रवेश नियम, ज्येष्ठता सूची, पदोन्नती स्थिती, सरळसेवा भरती स्थिती, बिंदूनामावली, अनुकंपा भरती, iGOT नोंदणी व प्रशिक्षण आणि कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक अद्ययावत करणे अशा 9 घटकांचा समावेश होता .



    या 9 उद्दिष्टांवर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या आयोग, प्राधिकरण, मंडळ, महामंडळ, सार्वजनिक उपक्रम, विद्यापीठ, स्वायत्त संस्था, महानगरपालिका, नगर परिषद यांचे गुणांकन दि. 26 जानेवारी 2026 रोजी जाहीर करण्यात आले आहे.

    निवडणूक आचारसंहितेमुळे प्रलंबित ठेवलेला जिल्हा परिषद कार्यालयांचा निकाल आज जाहीर करण्यात येत आहे.

    150 दिवसांच्या सेवाकर्मी प्लस कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सोलापूर, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, सातारा, हिंगोली, ठाणे आणि जळगाव जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्या चमूंचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हार्दिक अभिनंदन केले. सर्व विजेत्यांचा लवकरच राज्य शासनातर्फे गौरव करण्यात येईल.

    Top performance of officers and employees from Solapur, Pune, Nagpur, Sambhajinagar in the Sevakarmi Plus program in Maharashtra

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    शरद पवार गटाचा विलीनीकरणासाठी धडपडाट; पण सुनेत्रा पवारांच्या दिल्ली भेटीनंतरही सुनील तटकरेंची विलीनीकरणाला टांग!!

    Maharashtra Budget : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारी पासून; कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

    सुनेत्रा पवारांच्या दिल्लीत मोठ्या गाठीभेटी; त्याचवेळी रोहित पवारांची पत्रकार परिषद; पवार कुटुंबाची “डबल गेम”!!