वृत्तसंस्था
नाशिक : टोमॅटोला भाव मिळत नसल्याने राज्यात शेतकरी रस्त्यावर फेकत आहेत. टोमॅटो खरेदीवरुन केंद्र विरुद्ध राज्य सरकार यांच्यात संघर्ष सुरु आहे. टोमॅटोची निर्यात सुरूच आहे. या शिवाय आता एमआयएस योजनेंतर्गत राज्य सरकारनं टोमॅटोची खरेदी करावी आणि त्याची विक्री करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे आवाहन केंद्रीय केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले आहे.Tomato exports continue, state should now send proposal for MIS scheme to Central Government : Union Minister Bharti Pawar’s appeal
या खरेदी-विक्री व्यवहारात राज्याला जो तोटा येईल त्याचा ५० टक्के भार आता केंद्र सरकार उचलणार आहे. याबाबत राज्य सरकारनं केंद्राला प्रस्ताव पाठवण्याची सूचना डॉ. भारती पवार यांनी केली. पवार यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा केली. त्यांनी टोमॅटो निर्यात सुरु असल्याचे स्पष्ट केलं.
डॉ. भारती पवार म्हणाल्या की, दोन वर्षे सातत्याने ज्या प्रमाणे दर भेटला त्याच पार्श्वभूमीवर केंद्र आजही निर्यात खुली करण्याचा प्रयत्न करत आहेमात्र कोरोना आणि इतर देशांत मागणी नसल्याने निर्यात अधिक खुली कशी करता येईल, याबाबत काम करत आहोत. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. मागील दोन वर्षा प्रमाणे यावर्षी देखील जास्त भाव कसा मिळेल यासाठी प्रयत्नशील आहे. टोमॅटो निर्यात खुलीच, बंदी नाही : डॉ. पवार
टोमॅटो निर्यात खुली आहे, निर्यात बंद नाही, जिथे टोमॅटोचे भाव कमी आहे.तेथे MIS स्कीम राबवून तात्काळ नोटिफिकेशन काढले आहे. राज्यांनी तात्काळ केंद्राकडे याबाबतचे प्रस्ताव पाठवावे, यामध्ये राज्यांनी खरेदी केलेल्या मालाच्या नुकसानीत केंद्र पन्नास टक्के वाटा उचलणार आहे. केंद्रिय कृषी मंत्री तोमर यांच्याशी संपर्क करून चर्चा झाली. त्यांनी राज्याला पत्र देण्याचे सांगितले आहे. राज्यांना विंनंती की त्यांनी तात्काळ प्रस्ताव पाठवावे. केंद्राचे धोरण हे शेतकऱ्यांसाठी आहे, असे भारती पवार म्हणाल्या.
Tomato exports continue, state should now send proposal for MIS scheme to Central Government : Union Minister Bharti Pawar’s appeal
महत्त्वाच्या बातम्या
- Corona Vaccination : कोरोनाविरुद्ध लसीकरणाचा देशात नवा विक्रम, एका दिवसात ९३ लाखांहून जास्त डोस दिले
- दिल्ली विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने महाविद्यालय, वाजपेयी-जेटली यांच्या नावांनीही केंद्रांची उभारणी
- ओबीसी राजकीय आरक्षण बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी मांडल्या सूचना… कोणत्या?… त्या वाचा…!!
- देशाचा जीडीपी 9.5% राहण्याचा अंदाज, महागाईसुद्धा कमी होणार – RBI गव्हर्नर शक्तिकांत दास