• Download App
    विराट कोहलीच्या नेतृत्वाची आज अग्निपरिक्षा , न्यूझीलंडविरुद्ध असेल आजचा T20 सामनाToday's T20 match will be a test of Virat Kohli's leadership, against New Zealand

    विराट कोहलीच्या नेतृत्वाची आज अग्निपरिक्षा , न्यूझीलंडविरुद्ध असेल आजचा T20 सामना

    टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारत आणि न्यूझीलंड दोन वेळा आमने सामने आले आहेत. २००७आणि २०१६ साली दोन्ही टीममध्ये टी-२० वर्ल्ड कपमध्ये मॅच झाली, या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला.Today’s T20 match will be a test of Virat Kohli’s leadership, against New Zealand


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : आज ( ३१ ऑक्टोबर ) संध्याकाळी ७.३० वाजता या मॅचला सुरुवात होईल. भारत आणि न्यूझीलंडने स्पर्धेतले आपले पहिले सामने पाकिस्तानविरुद्धच गमावले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पराभव झाला तर टीम इंडियासाठी सेमी फायनल गाठणं कठीण होऊन बसेल. टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारत आणि न्यूझीलंड दोन वेळा आमने सामने आले आहेत. २००७आणि २०१६ साली दोन्ही टीममध्ये टी-२० वर्ल्ड कपमध्ये मॅच झाली, या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला.

    न्यूझीलंडविरुद्ध भारताला आज टी-२० विश्वचषकाच्या सुपर १२ साखळी लढतीत ‘करा किंवा मरा’ या निर्धारासह खेळावे लागेल. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वक्षमतेची आज अग्निपरीक्षा आहे.



    दरम्यान या सामन्यात चाहत्यांची अपेक्षापूर्ती होईल का?याबाबत सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे. पाकिस्तानविरुद्ध झालेला पराभव विसरून दुसऱ्या सामन्यात भारतीय खेळाडूंना कामगिरी सुधारावी लागणार आहे.

    कर्णधार या नात्याने अखेरची स्पर्धा खेळत असलेला कोहली हार मानणाऱ्यांपैकी नाही. तसेच अनेकदा संकटमोचक सिद्ध झालेला कोहली गेल्या काही महिन्यांपासून कर्णधार आणि फलंदाज या दोहोंमध्ये ताळमेळ साधू शकला नाही. भारतीय संघ अखेरच्या टप्प्यापर्यंत खेळत राहणे चाहत्यांचीच नव्हे तर आयसीसीच्या व्यावसायिक हिताची देखील गरज ठरावी. आयपीएल स्टार्सचा भरणा असलेला भारतीय संघ स्पर्धेतून लवकर बाद होण्यास केवळ एक पराभव कारणीभूत ठरू शकतो.

    Today’s T20 match will be a test of Virat Kohli’s leadership, against New Zealand

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

    Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली – देवेंद्र फडणवीस