प्रतिनिधी
रत्नागिरी – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा रत्नाहगिरीतून पुन्हा नव्या उत्साहात सुरू झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून ही या यात्रेतले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी त्यांनी रत्नागिरीत जास्तीत जास्त फूड प्रोसेसिंग युनिट उभारण्यासाठी केंद्र सरकार मदत करेल, अशी ग्वाही दिली.To set up maximum food processing unit in Konkan; Guwahati of Narayan Rane in Jan Ashirwad Yatra
विजय देसाई फॅक्टरी गोळप येथे आंबा-काजू बागायतदार आणि व्यावसायिकांची भेट घेऊन त्यांचे निवेदन स्वीकारले. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच कोकणात जास्तीत जास्त फूड प्रोसेसिंग युनिट उभारण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
तत्पूर्वी त्यांनी रत्नागिरीतील छत्रपति शिवाजी महाराज, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, श्यामराव पेजे यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केले.प्रचंड अडचणींना सामोरं जात दर वेळी निधड्या छातीने शत्रूंवर चाल करत स्वराज्याची स्थापना करणाऱ्या क्षत्रियकुलावतंस स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करत जन आशीर्वाद यात्रेला रत्नागिरी येथून पुन्हा प्रारंभ केला, असे नारायण राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
यानंतर नारायण राणे यांनी रत्नागिरीतल्या भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले. तसेच कुणबी बहुजन समाजाचे श्रद्धास्थान शामराव पेजे यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले.