विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : पूरग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची पंचगंगा परिक्रमा यात्रा सुरू केली आहे. To Give Justice to flood-hit farmers raju sheti organised The Panchganga Yatra
करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली येथील दत्त मंदिरात दुग्ध अभिषेक करून यात्रेला त्यांनी सुरुवात केली. पूरग्रस्त शेतकऱ्यांना २०१९ च्या महापुराच्या धर्तीवर नुकसान भरपाई मिळावी, शेतकऱ्यांचे कर्ज पीक माफ करावे यासह विविध मागण्या आहेत. पूरग्रस्त शेतकऱ्यांना तोकडी मदत जाहीर करणाऱ्या राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात राजू शेट्टी यांनी रणशिंग फुंकले आहे.
आज प्रयाग चिखली येथून या यात्रेला सुरुवात झाली आहे. तब्बल पाच दिवस ही यात्रा सुरु राहणार असून नृरसिंह वाडी येथे जलसमाधीने आंदोलनाची सांगता होणार आहे.
पूरग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पंचगंगा यात्रा
प्रयाग चिखली ते नृसिंहवाडी असा यात्रेचा मार्ग
नदीकाठावरून पाच दिवस चालत जाणार
प्रयाग चिखली दत्त मंदिरात दुग्ध अभिषेक करून यात्रेला प्रारंभ
२०१९ च्या महापुराच्या धर्तीवर नुकसान भरपाई द्या
नृरसिंहवाडी येथे जलसमाधीने आंदोलनाची सांगता
To Give Justice to flood-hit farmers raju sheti organised The Panchganga Yatra
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवारांचे रणनितीचे धडे, भाजपला फायदा होईल अशा आघाड्या करू नका
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ बंगल्यासमोरच मनसेने फोडली दहीहंडी; मुंबईत नियमभंग प्रकरणी चार ठिकाणी गुन्हे दाखल
- काश्मीरमध्ये सैन्य दलाची नवे पाऊल; दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांशी साधला संवाद; आपल्या मुलांना पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे केले आवाहन