• Download App
    पुण्यातील सॅलसबरी पार्कला खासगी व्यक्तीचे नाव नको -सॅलसबरी सिटीझन फोरमची मागणी|To change the name of salisbari park salasbari citizens forum opposed the new name and demanded PMC take decision to continuous old name

    पुण्यातील सॅलसबरी पार्कला खासगी व्यक्तीचे नाव नको ; सॅलसबरी सिटीझन फोरमची मागणी

    पुण्यातील सॅलसबरी पार्कचे नाव बदलण्यासाठी आंदोलन करून देखील उद्यानेचा नाव बदलण्यात आले आणि स्थानिक नगरसेवकांच्या वडिलांचे नाव देण्यात आले.   येथील नागरिकांनी ४० वर्षे लढा देऊन जागा परत मिळविली आहे. त्यामुळे उद्याला खासगी व्यक्तीचे नाव न देता ते पूर्वी सारखेच करावे, अशी मागणी सॅलसबरी सिटीझन फोरमकडून करण्यात आली.


    विशेष प्रतिनिधी

    पुणे- पुण्यातील सॅलसबरी पार्कचे नाव बदलण्यासाठी आंदोलन करून देखील उद्यानेचा नाव बदलण्यात आले आणि स्थानिक नगरसेवकांच्या वडिलांचे नाव देण्यात आले.   येथील नागरिकांनी ४० वर्षे लढा देऊन जागा परत मिळविली आहे. त्यामुळे उद्याला खासगी व्यक्तीचे नाव न देता ते पूर्वी सारखेच करावे, अशी मागणी सॅलसबरी सिटीझन फोरमकडून सोमवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली.To change the name of salisbari park salasbari citizens forum opposed the new name and demanded PMC take decision to continuous old name

    यावेळी फोरमचे अध्यक्ष फैजल पुनावाला, सचिव गोपाळ स्वामी, व्ही. पी. तनेजा, विनिता देखमुख, बाळासाहेब रुणवाल उपस्थित होते. देशमुख म्हणाल्या, की स्थानिक भाजप नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांच्या वडिलांचे सॅलसबरी पार्कला नाव देण्यात आले आहे. पण, याला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. गेल्या ४० वर्षापासून नागरिक या जागेसाठी लढा देत आहेत.



    उद्यानाच्या जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी तत्कालिन राष्ट्रपती ए. पी. जे अब्दुल कमाल यांना पत्र लिहले होते. त्यानंतर हा प्रश्न मार्गी लागला. तसेच, उद्योजक सायरस पूनावाला यांनी हे उद्यान सीएसआरमधून विकसित करून देण्याची तयारी दर्शवली होती. पण, त्याला विरोध करून नागरिकांच्या कराच्या पैशातून हे उद्यान विकसित केले. याला साधारण अडीच कोटी रूपये खर्च आला.

    महानगर पालिकेच्या नैमित्तिक समितीमध्ये (नाव समिती) मार्च २०२० मध्ये ठराव मंजूर करून श्रीनाथ भिमाले यांनी नाव बदण्यास परवानगी घेतली. पण, याला आमचा विरोध आहे. शहरातील अनेक उद्यानांना स्थानिक नगरसेवक त्यांच्या नातेवाईकांची नावे देतात. पण, महापालिकेच्या नियमानुसार फक्त राष्ट्रीय नेत्यांचीच नावे उद्यान व सार्वजनिक ठिकाणी देता येतात.

    पण, या ठिकाणी हा नियम पादळी तुडविला आहे. तसेच, महापालिकेकडे नाव बदल्यासाठी अथवा नवीन नाव ठेण्यासाठी ५७० प्रस्ताव आले आहेत. त्यामध्ये निम्म्यात नगरसेवकांच्या नातेवाईकांची नावे देण्याची मागणी केली आहे, असे ही देशमुख यांनी सांगितले.

    To change the name of salisbari park salasbari citizens forum opposed the new name and demanded PMC take decision to continuous old name

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Understand Geo politics : ज्यावेळी अमेरिका आणि चीन उतरले पाकिस्तानच्या बचावात, त्याचवेळी काँग्रेस आणि विरोधक मोदी सरकारला घेरायच्या बेतात!!

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!