बारामती अॅग्रो या कंपनीचे फीड निकृष्ठ दर्जाचे आहे. त्यामुळे आमच्या कोंबड्या अंडी देत नाहीत. याबाबत बारामती अॅग्रोचे मालक रोहित पवारांकडे तक्रारी करूनही दखल घेतली नाही. त्यांच्याकडे पेप्सी खाताना, दाढी करतानाचे फोटो सोशल मीडियावर टाकण्यासाठी वेळ आहे. परंतु, आमच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी वेळ नाही, असा आरोप केला जात आहे.Time to eat Pepsi, take photos while shaving but Rohit Pawar ignores our complaints about Baramati Agro, farmers allege
प्रतिनिधी
बारामती : बारामती अॅग्रो या कंपनीचे फीड निकृष्ठ दर्जाचे आहे. त्यामुळे आमच्या कोंबड्या अंडी देत नाहीत. याबाबत बारामती अॅग्रोचे मालक रोहित पवारांकडे तक्रारी करूनही दखल घेतली नाही. त्यांच्याकडे पेप्सी खाताना, दाढी करतानाचे फोटो सोशल मीडियावर टाकण्यासाठी वेळ आहे. परंतु, आमच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी वेळ नाही, असा आरोप शेतकरी करत आहे.
योगेश चौरे या पोल्ट्री व्यावसायिक शेतकऱ्याने एक व्हिडीओ टाकून आपली व्यथा मांडली आहे. बारामती अॅग्रोसह अन्य काही कंपन्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.या निकृष्ठ दर्जाच्या फिड्स मुळे कोंबड्या अंडी देत नसल्याची मुख्य तक्रार असून यामुळे प्रोडक्शन कमी झाले असल्याची समस्या आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील ठिकठिकाणाहून अनेक शेतकऱ्यांच्या पोल्ट्रीफिड़ संदर्भात तक्रारी येत आहेत. निकृष्ट दजार्चे फिड्स मिळाल्याने अनेक पोल्ट्रीफार्म धारकांचे लाखोंचे नुकसान होत आहे. पुणे जिल्ह्यातील काही ठिकाणी तर या कंपन्यांच्या विरोधात अनेक पोल्ट्रीफार्म चालकांनी पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे.
या संदर्भात या नामवंत कंपन्यांचे व्यवस्थापन देखील या शेतकऱ्यांच्या समस्येबाबत दखल घेत नाही व उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. कंपनीला अजुन ही समस्या कशामुळे उद्भवली आहे हे देखील सांगता येत नाहीये. शेतकºयांनी बारामती अॅग्रोकडे तक्रार केली मात्र या तक्रारीची कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप चौरे यांनी केला आहे.
रोहित पवार यांच्याशी देखील संपर्क साधण्याचा आम्ही प्रयत्न केला मात्र त्यांनी कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. पोल्ट्री व्यावसायिक अडचणीमध्ये असताना पवार हे साधी शेतकऱ्यांची भेट देखील घेत नसल्याने व्यथित झालो आहोत असे चौरे यांनी म्हटले आहे.
चौरे म्हणाले, निकृष्ठ दर्जाच्या फिड्सचा पुरवठा झाल्याने समस्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेण्यासाठी पवार यांच्याकडे वेळ नाही. मात्र सलूनमध्ये ट्रिमिंग करुन घेतल्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करायला कसा काय वेळ आहे.
Time to eat Pepsi, take photos while shaving but Rohit Pawar ignores our complaints about Baramati Agro, farmers allege
महत्त्वाच्या बातम्या
- नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्ररात स्वबळावर निवडणुका लढणार काँग्रेस, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनण्यास तयार
- Indian Navy Recruitment 2021 : बेरोजगार तरुणांना भारतीय नौदलात अधिकारी पदाची सुवर्णसंधी, अर्ज प्रक्रिया सुरू, वाचा तपशील
- Anti Conversion Law : उत्तर प्रदेशात महिलेचं धर्मांतर करणाऱ्या तिघांना अटक ; कायदा लागू झाल्यावर पाहिली कारवाई
- एलन मस्क यांच्या एका ट्वीटने Bitcoin मध्ये 13% उसळी, टेस्ला पुन्हा घेणार क्रिप्टोकरन्सीत पेमेंट