नाशिक : भाजपच्या सत्तेच्या वळचणीला राहून पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांमध्ये भाजपशीच लढायची अजितदादांवर वेळ येणार का??, असा सवाल विचारायची वेळ खुद्द अजित पवारांच्या वक्तव्याने आली. Pune + Pimpri Chinchwad Municipal Corporations,
आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक पार्श्वभूमीवर अजित पवारांनी पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांची बैठक घेतली. त्या बैठकीत त्यांनी सर्वांना निवडणुकीची तयारी करायला सांगितले. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक एकत्र लढवायच्या की वेगळ्या त्याचा वरिष्ठ नेते घेतील. तुम्ही आपला पक्ष पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये सगळ्या प्रभागांमध्ये पसरवा. सगळीकडे संपर्क ठेवा. निवडणुकीची तयारी करा, असे आदेश अजित पवार यांनी दिले.
पण त्याच वेळी त्यांनी एक महत्वाचे वक्तव्य केले. पुणे आणि पिंपरी चिंचवड या महापालिकांमध्ये आपली सत्ता होती. अनेक वर्षे आपण तिथे सत्ताधारी होतो. पण परिस्थिती बदलली. आता निवडणुकीसाठी दोन्हीकडे आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना वाढवावी लागेल. पुण्यामध्ये सदस्य नोंदणी करावी लागेल. पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या पक्ष संघटनेत मी स्वतः लक्ष घालेन. ऑगस्टमध्ये सगळ्याचा आढावा घेईन, असे अजित पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस अखंड असताना पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये त्या पक्षाची सत्ता होती. दोन्हीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे महापौर आणि स्थायी समितीचे अध्यक्ष होते. बाकीची पदे काँग्रेसकडे होती. पण 2014 नंतर परिस्थिती पूर्ण बदलली पुणे आणि पिंपरी चिंचवड या महापालिका भाजपच्या ताब्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी भाजपला वेगवेगळ्या पद्धतीने राजकीय रसद पुरवठा केला. पण भाजपने दोन्ही महापालिकांवर सत्तेची पकड मजबूत ठेवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः भाजपच्या पक्ष संघटनेत लक्ष घालून ती वाढवली. दोन्ही महापालिकांमध्ये प्रशासनावर त्यांनी वचक ठेवला. त्यामुळे आणि पिंपरी चिंचवड मधली राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय पकड ढिल्ली झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला भाजपने स्वतःच्या ताब्यात ठेवला. दोन्ही शहरांमधून राष्ट्रवादी काँग्रेसला होणारी सर्व प्रकारची राजकीय रसद भाजपने रोखून धरली.
– पवार काका – पुतण्यांनी गेमा केल्या, तर…
त्यामुळेच अजितदादांना पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये आपली सत्ता होती याची आठवण कार्यकर्त्यांना करुन द्यावी लागली. पण नव्या परिस्थितीत अजित पवार जरी भाजपच्या सत्तेच्या वळचणीला आले असले, तरी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका पुन्हा ताब्यात घेण्यासाठी त्यांना भाजपशीच लढत देण्याची वेळ आली. अर्थात महापालिका निवडणुकांसाठी महायुती झाली, तर अजितदादांना दुय्यम भूमिका स्वीकारून दोन्हीकडे सत्तेचा वाटा मिळेल. अन्यथा भाजप सारख्या बळकट पक्षाशी टक्कर घेणे अजितदादांच्या राष्ट्रवादीचा घास उरणार नाही. त्यासाठी त्यांना आतून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची संधान बांधावे लागेल. पण तेही तितके सोपे नाही. कारण भाजप पुणे आणि पिंपरी चिंचवडची सत्ता इतक्या सहजासहजी पवार काका – पुतण्यांच्या हातात जाऊ देणार नाही. किंबहुना काका – पुतण्यांनी आतून किंवा बाहेरून एक होऊन भाजपला त्रास द्यायचा प्रयत्न केला, तर त्याचा भाजप त्याचा जोरदार फटका काका आणि पुतण्यांच्याच पक्षांना देईल.
त्यामुळे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपशी समन्वय ठेवून काही मिळाले, तरच अजितदादांना काही मिळू शकेल. अन्यथा भाजपशी संघर्ष केला, तर भाजपने दिलेला सत्तेचा वाटा देखील गमावायची वेळ येऊ शकेल.
Time for Ajit to fight BJP in Pune + Pimpri Chinchwad Municipal Corporations, staying in the grip of BJP’s power
महत्वाच्या बातम्या
- Bangladesh : बांगलादेशात हिंदू व्यापाऱ्याची दगडाने ठेचून हत्या; कपडे काढून अंगावर नाचले, 5 हल्लेखोरांना अटक
- उल्फाच्या छावणीवर शंभर ड्रोनद्वारे अचूक हल्ला; म्यानमारमध्ये भारतीय लष्कराचा सर्जिकल स्ट्राइक
- Arunachal Pradesh : रेप-छेडछाडीच्या आरोपीची जमावाकडून पोलिस ठाण्याबाहेर हत्या; 20हून अधिक अल्पवयीन मुलींचे शोषण
- Pakistan : पाकिस्तानने म्हटले- भारताने 6 लढाऊ विमाने गमावल्याचे सत्य स्वीकारावे; डोभाल यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर