• Download App
    Rabi crops 30 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता, रब्बी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न

    Rabi crops : 30 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता, रब्बी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न

    rabi crops

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई :  Rabi crops  30 मार्चपासून राज्यात ढगाळी हवामान आणि दुपारनंतर होणाऱ्या वादळी पावसाचे नवीन सत्र सुरू होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 30 मार्च रोजी प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. उर्वरित विदर्भात देखील काही प्रमाणात हवामानात बदल दिसून येऊ शकतो. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून शेतकऱ्यांना सावध केले.Rabi crops

    – वादळी पावसाची दाट शक्यता

    30 मार्चच्या तुलनेत 31 मार्च रोजी एकंदरीत वादळी पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, या भागांमध्ये काही प्रमाणात अस्थिर हवामान आणि वादळी पाऊस पडू शकतो.Rabi crops



     

    त्यानंतर 1 ते 4 एप्रिल दरम्यान वादळी पावसाचे प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच, वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले.

    मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशा वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे, असेही आवाहन केले आहे.

    Thunderstorms and rains likely in the state between March 30 and April 4, efforts to prevent damage to rabi crops

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणानंतर सुनेत्रा पवारांचे नेतृत्व प्रस्थापित आणि सुरक्षित राहील??

    Maharashtra : राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज; मध्य महाराष्ट्र, खान्देश, मराठवाड्यात गारपिटीची शक्यता

    Condom Prices : कंडोम 50% पर्यंत महागण्याची शक्यता; इराण युद्धामुळे कच्च्या मालाचा पुरवठा थांबला