• Download App
    नंदुरबारमध्ये 'द बर्निंग ट्रेन'चा थरार : गांधीधाम एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना आग, प्रवाशांमध्ये गोंधळ, अग्निशमनचे चार बंब घटनास्थळी । Thunder of The Burning Train in Nandurbar Two coaches of Gandhidham Express caught fire, confusion among passengers, four fire bombs at the scene

    नंदुरबारमध्ये ‘द बर्निंग ट्रेन’चा थरार : गांधीधाम एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना आग, प्रवाशांमध्ये गोंधळ, अग्निशमनचे चार बंब घटनास्थळी

    नंदुरबार रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर गांधीधाम-पुरी एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना आग लागली. आगीच्या घटनेनंतर प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ उडाला. आता या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तथापि, आग वाढण्याआधीच आग लागलेले दोन डबे इतर डब्यांपासून वेगळे करण्यात आले आहेत. Thunder of The Burning Train in Nandurbar Two coaches of Gandhidham Express caught fire, confusion among passengers, four fire bombs at the scene


    विशेष प्रतिनिधी

    नंदुरबार : नंदुरबार रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर गांधीधाम-पुरी एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना आग लागली. आगीच्या घटनेनंतर प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ उडाला. आता या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तथापि, आग वाढण्याआधीच आग लागलेले दोन डबे इतर डब्यांपासून वेगळे करण्यात आले आहेत.

    गांधीधाम येथून पुरीकडे ही रेल्वे जात होती. नंदुरबार स्थानकापासून काही अंतरावर असताना रेल्वेतील पॅन्ट्रीकारला अचानक आग लागली. पाहता पाहता हीआग एसी डब्यांपर्यंत पसरली. आगीची माहिती कळताच रेल्वे तत्काळ थांबवण्यात आली. यानंतर प्रवाशांना ताबडतोब डब्यांमधून बाहेर काढण्यात आले. प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.



    पश्चिम रेल्वेचे संपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना सांगितले की, गांधीधाम – पुरी एक्सप्रेसमधील डब्याला आग लागली होती. आग लागलेला डबा इतर गाडीपासून वेगळा करून आग विझविण्याचं काम सुरू आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आली नाही. चौकशीअंती ते समोर येईल. सुदैवाने या घटनेत कुणालाही हानी झाली नाही.

    आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे चार बंब तेथे दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाचे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग लागलेले डबे इतर डब्यांपासून वेगळे करण्यात आले आहेत. आग लागल्याचे कळताच रेल्वे थांबवण्यात आली, प्रवासी ताबडतोब उतरल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

    Thunder of The Burning Train in Nandurbar Two coaches of Gandhidham Express caught fire, confusion among passengers, four fire bombs at the scene

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस