वृत्तसंस्था
रायगड: रायगड पालकमंत्री हटवण्यासाठी शिवसेनेचे तीन आमदार एकवटले असून शक्तिप्रदर्शन आणि स्वाक्षरी अभियान राबवून मुख्यमंत्र्यांवर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.
Three Shiv Sena MLAs rallied to remove Raigad Guardian Minister; Demonstrations, signature campaigns
रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. शिवसेना व राष्ट्रवादीत धुमशान सुरु आहे. पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याविरोधात तीन आमदारांनी रणशिंग फुंकले आहे. त्या विकासकामांच्या निधी वाटपात भेदभाव करीत आहेत,
तसेच प्रत्येक विकासकामात श्रेय घेत आहेत, असा आरोप आ. भरत गोगावले, आ. महेंद्र दळवी, आ.महेंद्र थोरवे केला. अलिबागच्या आढावा बैठकीत शिवसेनेने पालकमंत्री हटावचा नारा दिला. यावेळी महाडचा आमदार बदलणार नाही तर श्रीवर्धनचा आमदार व रायगडचा खासदार बदलण्याची वेळ आली आहे, असे आढावा बैठकीत शिवसेना आमदारांनी ठासून सांगितले. जिल्ह्यात स्वाक्षरी मोहीम राबवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देणार असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले.