• Download App
    अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी दोन लाखांची लाच घेणाऱ्या डीवायएसपीसह दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना पकडले|Three policemen, including a DYSP, arrested for taking bribe of Rs 2 lakh to help in atrocity case

    अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी दोन लाखांची लाच घेणाऱ्या डीवायएसपीसह दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना पकडले

    अ‍ॅट्रॉसिटीचा दाखल असलेला गुन्हा मागे घेतला जावा यासाठी मदत करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यासह (डीवायएसपी) दोन पोलीस कर्मचाऱ्यां ना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.Three policemen, including a DYSP, arrested for taking bribe of Rs 2 lakh to help in atrocity case


    प्रतिनिधी

    जालना : अ‍ॅट्रॉसिटीचा दाखल असलेला गुन्हा मागे घेतला जावा यासाठी मदत करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच घेणाºया पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यासह (डीवायएसपी) दोन पोलीस कर्मचाऱ्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.

    सुधीर अशोक खिराडकर असे या डीवायएसपीचे नाव आहे. त्याच्यासोबत पोलीस नाईक संतोष निरंजन अंभोरे, पोलीस शिपाई विठ्ठल पुंजाराम खार्डे या तिघांना अटक करण्यात आली आहे.



    जालना जिल्ह्यातील एकावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होता. त्यामुळे त्यांना त्रास होत होता. या गुन्ह्यामध्ये त्यांना मदत करण्यासाठी खिराडकर यांनी पाच लाख रुपयांची मागणी केली.

    तडजोडीनंतर तीन लाख रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. अंभोरे दोन लाख रुपयांची रक्कम स्वीकारत असताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगे हात पकडले.

    पोलीस उपअधीक्षक वर्षांराणी पाटील, पोलीस निरीक्षक सुनील क्षीरसागर, पोलीस हवालदार नवनाथ वाळके,पोलीस शिपाई किरण चिमटे, दिनेश माने यांनी ही कारवाई केली

    Three policemen, including a DYSP, arrested for taking bribe of Rs 2 lakh to help in atrocity case

     

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ