विशेष प्रतिनिधी
पालघर : अंतयात्रा चालू असताना या तिघांनी गावातील अंतयात्रेत सहभागी असणाऱ्या लोकांना मारहाण केली व शिवीगाळ केली असे पोलिस म्हणाले. या तिघांवर अंतयात्रा प्रसंगी गोंधळ करणे व शोकाकुल लोकांवर हल्ला करणे या आरोपाखाली पालघर मधील एका गावामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
Three people arrested for assaulting and creating ruckus at funeral
सदर घटना शनिवारी घडली आहे. कलम २९७ अंतर्गत दफनविधी च्या ठिकाणी बेकायदा प्रवेश करणे तसेच कलम 341 तसेच आयपीसी आणि शेड्युल कास्ट शेड्युल ट्राइब्ज(प्रिवेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज) अॅक्ट, १९८९ खालील तरतुदी अंतर्गत साफळे पोलीसस्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे अधिकाऱ्यानी सांगितले.
पालघरच्या कापड कारखान्यात स्फोट, बॉयलर स्फोटामुळे एका कामगाराचा मृत्यू; चार जखमी
५६ वर्षाच्या वृद्ध महिलेचे आजाराने निधन झाले होते व ती अंतयात्रा चालू असता आरोपी विनोद सखाराम ठाकूर, सरिता विनोद ठाकुर आणि नचिकेत विद्या ठाकूर यांनी शोकाकुल लोकांना स्मशानभूमीत जाण्यापासून रोखले. या ठिकाणी अंतयात्रेतील सहभागी लोकांना शिवीगाळ केल्याचे व काही लोकांना मारहाण केल्याचे सांगण्यात आले आहे. या अंत्ययात्रेत सामील असल्यापैकी एकाने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे व सदर तक्रार दाखल करून पुढील चौकशी चालू आहे.
Three people arrested for assaulting and creating ruckus at funeral
महत्त्वाच्या बातम्या
- पीएम केअर्स फंड हा सरकारी निधी नाही, केंद्राचे न्यायालयात शपथपत्र
- न्यायाधीश आनंद यांना हत्येसाठी जाणीवपूर्वक धडक : सीबीआयची न्यायालयात माहिती
- पुण्यातील निर्बंध ऑक्टोबरपासून शिथिल; पालकमंत्री अजित पवार यांचे कोरोना आढावा घेतल्यावर संकेत
- सबका साथ, सबका विकास, आत्मनिर्भरता, स्टार्ट अप्स, स्किल डेव्हलपमेंट संकल्पनांची मूळे दीनदयाळजींच्या “सबको काम” अर्थनीती मध्ये!