विशेष प्रतिनिधी
नाशिक : नाशिकमध्ये तीन तोतया लष्करी अधिकाऱ्यांना अटक केली आहे. येथील देवळाली कॅम्प या संवेदनशील परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
Three False military officers arrested; Action at Deolali camp in Nashik
देवळाली कॅम्प भाग हा लष्कर परिसर म्हणून ओळखला जातो. देवळाली परिसर हा संपूर्ण लष्कराचा भाग एक प्रतिबंधित आणि संवेदनशील भाग आहे. या ठिकाणी भारतीय सैन्याकडे असलेल्या विविध आधुनिक आणि युद्धासाठी वापरण्यात येत असलेल्या तोफांसह इतर शस्त्रास्त्रांच प्रशिक्षण दिलं जातं. मात्र, अशा संवेदनशील परिसरात गेल्या १५ दिवसांत तीन तोतया लष्करी अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली.
नाशिकच्या रावण घोड्याची मोठी चर्चा; सारंगखेडा येथील अश्व यात्रेत कुतूहल
लष्कराच्या प्रतिबंधित क्षेत्रात संशयितरित्या हे तोतया लष्करी अधिकारी फिरत होते. संशय येताच लष्कराच्या अधिकाऱ्यांनी या दोघांना ताब्यात घेतलं. तर १५ दिवसांपूर्वी त्यांच्यासारख्याच एकाला याच परिसरातून ताब्यात घेतले होतं. त्यामुळे प्रतिबंधीत आणि संवेदनशील भागात दोन वेळा अशा घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
ताब्यात घेतलेल्या या संशयिताकडे चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांच्यावर देवळाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या घटनेची अधिक चौकशी पोलीस आणि लष्कराचे वरिष्ठ अधिकारी करत आहेत.
Three False military officers arrested; Action at Deolali camp in Nashik
महत्त्वाच्या बातम्या
- UP Assembly Election : उत्तर प्रदेशात 10 फेब्रुवारी ते 7 मार्च असे सात टप्प्यांत होणार मतदान, वाचा सविस्तर…
- Assembly Election २०२२ Date : पाच राज्यांमध्ये निवडणूकीची घोषणा, १० मार्चला निकाल, यूपी-पंजाब-उत्तराखंड-गोवा आणि मणिपूरमध्ये कधी होणार मतदान? वाचा सविस्तर…
- दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांना कोरोनाची लागण , ट्विट करून दिली माहिती