• Download App
    Gyanradha 23 कोटींच्या फसवणूकप्रकरणी‘ज्ञानराधा’च्या तीन संचालकांना अटक,

    Gyanradha : 23 कोटींच्या फसवणूकप्रकरणी‘ज्ञानराधा’च्या तीन संचालकांना अटक, आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

    Gyanradha

    विशेष प्रतिनिधी

    बीड : Gyanradha ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या तीन संचालकांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपी आशिष पद्माकर पाटोदेकर (३२, रा.साऊथ कसबा, दत्त चौक, सोलापूर), यशवंत वसंतराव कुलकर्णी (५४, शिंदेनगर, बीड) व वैभव यशवंत कुलकर्णी (२५, शिंदेनगर, बीड) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत.Gyanradha



    आरोपींना ४ महिन्यांपूर्वी बीड येथे अटक करण्यात आली होती. त्यांचा ताबा आता आर्थिक गुन्हे शाखेने घेतला. पुढील तपासाच्या दृष्टीने त्यांना न्यायालयात हजर केले असता १४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

    १२ टक्के व्याजाचे आमिष

    ‘ज्ञानराधा’चे संचालक सुरेश कुटे व इतर संचालकांनी मासिक गुंतवणूक योजनेच्या माध्यमातून ठेवीदारांना १२ टक्के व्याज परताव्याचे आमिष दिले. मात्र, प्रत्यक्षात रक्कम परत केली नाही. याबाबत फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या घोटाळ्यातील रक्कम २३ कोटी १५ लाखांच्या घरात आहे.

    Three directors of ‘Gyanradha’ arrested in Rs 23 crore fraud case, Economic Offences Wing takes action

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sanjay Gaikwad : दोन्ही भाऊ एकत्र आले तरी मुंबईत महायुती जिंकेल; संजय गायकवाड यांचा दावा; ठाकरेंची युती स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी – जयकुमार गोरे

    Supriya Sule : नाराजी घरी चालते, समाजात काम करताना नाही; सुप्रिया सुळेंचे प्रशांत जगपात यांना खडेबोल

    Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे बंधू म्हणजे मुंबई किंवा मराठी नाही; अस्तित्व टिकवण्यासाठी दोन पक्ष एकत्र आलेत