• Download App
    गणेशोत्सवात लालबाग राजाच्या चरणी साडेतीन किलो सोने, ६४ किलो चांदी अन् तब्बल पाच कोटींहून अधिक दान अर्पण  three and a half kilos of gold 64 kilos of silver and more than five crores of charity were offered at the feet of the Lalbagh Raja

    गणेशोत्सवात लालबाग राजाच्या चरणी साडेतीन किलो सोने, ६४ किलो चांदी अन् तब्बल पाच कोटींहून अधिक दान अर्पण

      याशिवाय दान केलेल्या रोख रकमेची मोजणी अद्यापही सुरू आहे.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई :   राज्यभरात नुकताच  गणेशोत्सव जल्लोषात साजरा झाला. मुंबई,  पुणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये तर गणेशोत्सवाचा उत्साह काही वेगळाच असतो, येथील गणेशोत्सव बघण्यासाठी अगदी देशभरातून लोक आवर्जून येत असतात. मुंबईतील लालबागचा राजाचा भाविक वर्गही प्रचंड मोठा आहे. त्यामुळे गणेशोत्सवात अगदी सर्वसामान्यापासून ते सेलिब्रेटीपर्यंत सर्वजण दर्शनासाठी आवर्जून येतात, यावेळी त्यांच्याकडून लालबागच्या राजाच्या चरणी मोठ्याप्रमाणात  दानही अर्पण केले जाते. यंदाच्या गणेशोत्सवात लालाबागच्या राजाच्या चरणी अर्पण झालेल्या दानाची किंमत व माहिती समोर आली आहे. During Ganeshotsav three and a half kilos of gold 64 kilos of silver and more than five crores of charity were offered at the feet of the Lalbagh Raja

    लालबागच्या राजाला दरवर्षी करोडोंचे दान अर्पण केले जाते. यंदा सोन्या-चांदीशिवाय इलेक्ट्रिक बाइक आणि सीझन क्रिकेट बॅटही देण्यात अर्पण करण्यात आली आहे.  गणेशोत्सवानंतर आता लालबागच्या राजाला अर्पण केलेल्या दागिन्यांचा लिलाव करण्यात आला आहे. अर्पण साहित्य घेण्यासाठी लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांची गर्दी झाली होती. बड्या उद्योगपतींपासून ते देशातील मोठे नेते, अभिनेतेही लालबागच्या दरबारात नतमस्तक होतात.

    ”मी लवकरच सार्वजनिक मंडळांच्या प्रमुखांशी बोलणार” राज ठाकरेंचं विधान!

    या वर्षीही भाविकांनी लालबागच्या राजाच्या चरणी मनापासून दान अर्पण केले. बाप्पाला एकूण साडेतीन किलो सोने ज्याची किंमत सुमारे दोन कोटी दहा लाख रुपये आहे आणि सुमारे ४५ लाख रुपयांची सुमारे ६४ किलो चांदी भाविकांनी दान केली आहे. याशिवाय दान केलेल्या रोख रकमेची मोजणी सुरू आहे. मोजणीच्या आठ दिवसांत आतापर्यंत ५ कोटी १६ लाख रुपये मोजले गेले आहेत. पैशांची मोजणी पूर्ण होण्यासाठी आणखी दोन दिवस लागू शकतात. एकूण रोख रक्कम ८ कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

     three and a half kilos of gold 64 kilos of silver and more than five crores of charity were offered at the feet of the Lalbagh Raja

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा