प्रतिनिधी
मुंबई : “स्वातंत्र्यवीर सावरकर” आणि “अटल” या घोषित सिनेमांचे निर्माते संदीप सिंह यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, ही धमकी सिंह याच्या फेसबुक अकाउंटवर कृष्णा राजपूत नावाच्या अनोळखी अकाउंटवरून देण्यात आली आहे. “मुसावाला को जिस तरसे गोली मारी थी उसी तरह एक दिन तुझे मारा जायेगा”, अशी धमकी सिंह यांना देण्यात आली आहे. याप्रकरणी आंबोली पोलीस ठाण्यात सिंह यांनी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. Threats to kill movie producer Sandeep Singh
संदीप सिंह हे हिंदी चित्रपट निर्माते असून त्यांनी अटल बिहारी वाजपेयी जीवनावर आधारित “अटल” तसेच वीर सावरकर यांच्यावर आधारित “स्वातंत्रवीर सावरकर” त्याचबरोबर बॉलिवूडमध्येही अनेक चित्रपटाची निर्मिती केली आहे. काही दिवसांपूर्वी अज्ञात इसमाने कृष्णा राजपूत या फेसबुक अकाउंटवरून सिंह यांच्या अधिकृत फेसबुकवर एका पोस्टखाली कमेंटबॉक्समध्ये त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली, “चिंता ना कर जिस तरह सिद्धू मुसेवाला को गोली मारा गया है , ठीक उसी तरह तुझे भी एक दिन मारा जायेंगा वेट कर और याद रख” या आशयाची धमकी देण्यात आली आहे.
याप्रकरणी संदीप सिंह यांनी आंबोली पोलीस ठाण्यात बुधवारी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अनोळखी फेसबुक खातेदाराविरुद्ध धमकीचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडोपंत बनसोडे यांनी दिली. धमकी देणाऱ्या व्यक्तीचा लॉरेन्स बिष्णोई टोळीचा काही संबंध आहे का?, याबाबत तपास सुरू असल्याचे बनसोडे यांनी सांगितले.
Threats to kill movie producer Sandeep Singh
महत्वाच्या बातम्या
- चहावाला पंतप्रधान, रिक्षावाला मुख्यमंत्री!!; ठाण्यात रिक्षाचालकांनी लावलेत अभिमान फलक!!
- राष्ट्रवादीचे भरण पोषण रोखले; अजित दादांनी घाईघर्दीत दिलेला 13,340 कोटींचा निधी शिंदे – फडणवीस सरकारने रोखला!!
- औरंगाबाद नामांतराला विरोध : महाविकास आघाडीच्या शेवटाचे स्क्रिप्ट, काँग्रेस – राष्ट्रवादीचा एक्झिट प्लॅन!!
- मॅजिक ऑफ 39 : भारताला लोकशाही शिकवण्याचा दंभ बाळगणाऱ्या ब्रिटनमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाची पुनरावृत्ती!!
- शिवसेनेत फूट : ठाण्यातील सर्व 66 नगरसेवक शिंदे गटात सहभागी; ठाकरे गटाला दणका!!