• Download App
    मुकेश अंबानींना दुसऱ्या दिवशीही धमकी; 200 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी; एका दिवसापूर्वी मागितले होते 20 कोटी|Threat to Mukesh Ambani the next day too; A ransom demand of Rs 200 crore; 20 crore was asked for a day ago

    मुकेश अंबानींना दुसऱ्या दिवशीही धमकी; 200 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी; एका दिवसापूर्वी मागितले होते 20 कोटी

    वृत्तसंस्था

    मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. त्यांना शनिवारी आलेल्या ई-मेलमध्ये एका अज्ञात व्यक्तीने 200 कोटी रुपयांची मागणी केली आहे. याआधी शुक्रवारी (27 ऑक्टोबर) संध्याकाळी याच मेल आयडीवरून 20 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील सर्वोत्तम शूटर्सकडून मारले जाईल, असे मेलमध्ये म्हटले होते.Threat to Mukesh Ambani the next day too; A ransom demand of Rs 200 crore; 20 crore was asked for a day ago



    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याच अकाउंटवरून आलेल्या मेलमध्ये ‘आमच्या ईमेलला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, त्यामुळे आता ही रक्कम 200 कोटी रुपये झाली आहे, जर ती मिळाली नाही तर डेथ वॉरंटवर स्वाक्षरी निश्चित समजा,’ असे लिहिले आहे. यापूर्वी 27 ऑक्टोबरच्या ईमेलमध्ये ‘IF you don’t give us 20 crore rupees, we will kill you, we have the best shooters in india’, असे लिहिले होते. हा ईमेल मिळाल्यानंतर, मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारी यांच्या तक्रारीच्या आधारे, गावदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम 387आणि 506 (2) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.

    याआधीही अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यामुळे गेल्या वर्षी २९ सप्टेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यांची सुरक्षा झेड श्रेणीवरून झेड+ केली होती. सुरक्षेचा खर्च मुकेश अंबानी करतात. हा खर्च दरमहा 40 ते 45 लाख रुपये आहे.

    फेब्रुवारी 2021 मध्ये, स्फोटकांनी भरलेली SUV अँटिलियाच्या बाहेरून जप्त करण्यात आली होती, ज्यामध्ये 20 जिलेटिनच्या कांड्या आणि एक पत्र सापडले होते. पत्रात मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांना धमकी देण्यात आली होती. या प्रकरणात मुंबई पोलिसांचा एन्काउंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे याचे नाव पुढे आले होते. सध्या NIA या प्रकरणाचा तपास करत आहे.

    Threat to Mukesh Ambani the next day too; A ransom demand of Rs 200 crore; 20 crore was asked for a day ago

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस