विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीत हजारो उमेदवारांची भरमार करून निवडणूक आयोगाची आणि शिंदे – फडणवीस सरकारची कोंडी करण्याचा डाव मराठ्यांनी टाकल्याची कबुलीच मनोज जरांगे यांनी आजच्या बीड मधल्या पत्रकार परिषदेत दिली. Thousands of candidates in the Lok Sabha elections on the appeal of Jarange
लोकसभा निवडणुकीत हजारो उमेदवार उभे करण्याचा निर्णय मराठा समाजाने घेतला आहे. तो मी घेतलेला नाही. मराठा समाज माझा मालक आहे, मी त्याचा मालक नाही. मराठा समाजाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे तो ते वापरणार आहेत, असे वक्तव्य मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत केले.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलेल्या आवाहनानुसार माढा लोकसभेसाठी पंढरपूर तालुक्यातील पळशी गावातील चार उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. ही मागणी मान्य करण्यासाठी जरांगे यांनी आता निवडणुकीच्या माध्यमातून सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यातूनच त्यांनी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून किमान 5 उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे मराठा समाजाला आवाहन केले आहे.
मनोज जरांगेंवर “ट्रॅप” लावलाय हे खरे, पण तो लावलाय नेमका कोणी??
पळशी येथील मराठा समाजाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार धनंजय कलागते, संतोष झांबरे, विठ्ठल काटवटे आणि सचिन पवार यांची माढ्यातून उमेदवारी जाहीर केली आहे. लोकसभेसाठी प्रत्येक गावातून 2 अर्ज, 5000 उमेदवार देणार आहेत. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याविरुद्धही अर्ज भरण्यात येणार आहेत. नुकतीच बीडमध्ये मराठा समाजाची बैठक झाली. बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत प्रत्येक गावातून दोन उमेदवार अर्ज भरणार आहेत, तर दुसरीकडे फक्त मराठा समाजातील उमेदवार नसेल तर इतर समाजातीलदेखील लोकांना या निवडणुकीत सरकारच्या विरोधात उभे करण्याची रणनीती मराठा सकल समाजाने आखली आहे. मराठा आरक्षण प्रश्नावर बीड तालुक्यातील धीरज मस्के या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या कुटुंबाला मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली. या वेळी नारायण गडचे महंत शिवाजी महाराज उपस्थित होते. मनोज जरांगे हे आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत.
मनोज जरांगे यांनी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलनाची हाक दिल्यानंतर हिंगोलीत मराठा आंदोलकांनी राज्य सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी दाखल झालेल्या वाहनांवर हल्ला करत पोस्टर फाडले. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील वरुड गावात हा प्रकार घडला आहे. या वेळी आंदोलकांनी ‘एक मराठा लाख मराठा’ अशा आशयाच्या घोषणा दिल्या. मराठा आरक्षणाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावा, अन्यथा परिणाम भोगायला तयार राहा, असा गर्भित इशारादेखील आंदोलकांनी दिला.
Thousands of candidates in the Lok Sabha elections on the appeal of Jarange
महत्वाच्या बातम्या
- भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा दिला राजीनामा
- ‘शासन आपल्या दारी’ हा लोकाभिमुख उपक्रम; चार कोटी लोकांना मिळाला लाभ
- हरियाणा पोलिसांना यश, इनेलोचे नेते नफे सिंह राठी खूनप्रकरणी गोव्यातून 2 शूटर्सना अटक
- लालूंनी काल पाटण्यातून मोदींना दिली “संधी”; मोदींनी आज चेन्नईतून उडवली DMK – INDI परिवारवादाची “दांडी”!!
- सनातन धर्माचा अपमान; सुप्रीम कोर्टाची उदयनिधी स्टालिनला सणसणीत चपराक!!