• Download App
    मोदींना दिला म्हणून ठाकरे - नानांना टिळक पुरस्काराचे वावडे; पण काँग्रेस, कम्युनिस्ट, समाजवादी नेत्यांना दिला तेव्हा तोंड केले नव्हते वाकडे!!|Though thackeray and nana patole created controversy over lokmanya tilak award, this was given to socialist, communist and Congress leaders earlier

    मोदींना दिला म्हणून ठाकरे – नानांना टिळक पुरस्काराचे वावडे; पण काँग्रेस, कम्युनिस्ट, समाजवादी नेत्यांना दिला तेव्हा तोंड केले नव्हते वाकडे!!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींना 2023 चा लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झाला म्हणून उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना त्या पुरस्काराचेच वावडे निर्माण झाले आहे. पण ज्यावेळी कम्युनिस्ट, समाजवादी यांच्यापासून काँग्रेस नेत्यांना टिळक पुरस्कार दिला, तेव्हा मात्र या दोघांनी कधी तोंड वाकडे केल्याचे उदाहरण सापडत नाही.Though thackeray and nana patole created controversy over lokmanya tilak award, this was given to socialist, communist and Congress leaders earlier

    पंतप्रधान नरेंद्र मोदींना शरद पवारांच्या हस्ते टिळक पुरस्कार देणार म्हणून उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत त्या पुरस्कारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले, तसेच नाना पटोले यांनी देखील त्याविषयी नाराजी व्यक्त केली. पुण्याच्या काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी नानांना त्या संदर्भात पत्र लिहिले. एकूण उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने त्यावर राजकारण सुरू केले.



    पण टिळक पुरस्कार आणि त्याचा इतिहास पाहिला, तर त्यात राजकारण कमी आणि समाजकारण अधिक असल्याची उदाहरणे सापडतात.

    लोकमान्य टिळक सन्मान पुरस्कार ही कोणत्या एका पक्षाची मक्तेदारी कै. जयंतराव टिळक यांनी ठेवली नव्हती. 1982 मध्ये टिळक पुरस्काराची सुरुवातच मुळी त्यांनी पहिला पुरस्कार समाजवादी नेते एस. एम. जोशी यांना प्रदान करून केली होती. त्यानंतर भारतीय काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी डॉ. मनमोहन सिंग, प्रख्यात शास्त्रज्ञ आणि अणुस्फोटाचे जनक आर. चिदंबरम, माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन, प्रणव मुखर्जी आदी नेते आणि शास्त्रज्ञ टिळक पुरस्काराचे मानकरी ठरले.

    मात्र 2023 चा लोकमान्य टिळक पुरस्कार मोदींना जाहीर केल्यानंतर उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि नाना पटोले या नेत्यांनी त्याचे राजकारण करून मोदी आणि पुरस्कारांशी संबंधित व्यक्तींवर टीकास्त्र सोडले आहे.

    Though thackeray and nana patole created controversy over lokmanya tilak award, this was given to socialist, communist and Congress leaders earlier

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!

    Devendra Fadnavis : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार म्हणजे खेळाडूंच्या मेहनतीला राजमान्यता – देवेंद्र फडणवीस