विशेष प्रतिनिधी
मुंबई : 100 कोटींच्या वसुली प्रकरणात ठाकरे – पवार सरकारमधील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची जामीनावर सुटका होऊन त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आर्थर रोड जेल बाहेर स्वागत केले असले तरी त्यांच्या सुटकेची नेमकी वस्तुस्थिती काय आहे??, हे लक्षात घेतले तर राष्ट्रवादी काँग्रेसने अनिल देशमुख यांचे स्वागत करून विशिष्ट नॅरेटिव्ह तयार केल्याचे लक्षात येते. Though Anil Deshmukh is out of Ather road jail, NCP welcomed him, the fact is different
अनिल देशमुख यांचे आर्थर रोड जेल बाहेर स्वागत करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गुन्हेगारांचे उदात्तीकरण करण्याचा पायंडा पाडून राजकीय गुन्हेगारीला उत्तेजन देत आहे, अशी टीका सोशल मीडियावर सुरू आहे. अनिल देशमुख स्वतःला निर्दोष असल्याचे मानून ऐकीव माहितीवर मला अटक झाली, असे माध्यमांना सांगितले आहे.
पण ही वस्तुस्थिती आहे का??, हे पुढच्या काही मुद्द्यांवर नजर टाकल्यावर स्पष्ट होईल
- मुंबई हायकोर्टाने अनिल देशमुख यांना फक्त आणि फक्त “हेल्थ मिरीट”वर जामीन मंजूर केला आहे.
- 3 एप्रिल 2022 ला अनिल देशमुख यांनी मुंबई हायकोर्टात तब्येत ठीक नाही, वयाचा विचार करून वैद्यकीय मिरीट वर जामीन मंजूर करावा, असा अर्ज केला होता. त्यासाठी त्यांनी बाथरूम मध्ये घसरून पडल्याचा हवाला दिला होता.
- प्रत्यक्षात 100 कोटींच्या वसुली प्रकरणात, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात मुंबई हायकोर्टात अनिल देशमुखांची केस सुरूच राहणार आहे.
- अनिल देशमुख यांचे दोन स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे हे दोघेही अद्याप तुरूंगात आहेत. या दोघांनीही , ED आणि CBI तपास यंत्रणांना अनिल देशमुख यांच्या विरोधात जबाब दिला आहे.
- अनिल देशमुख यांच्या विरोधात सचिन वाझेनी CBI विरोधात जबाब नोंदवला आहे. विशेष म्हणजे मजिस्ट्रेट समोर नोंदवलेला जवाब कोर्टाने नाकारलेला नाही.
- अनिल देशमुख यांच्याविरोधात सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांनीही जबाब नोंदविला आहे.
- अनिल देशमुख यांची 300 कोटींची मालमत्ता ED ने जप्त केली आहे. त्यांच्या निकटवर्तीयांच्या नावावर बंगाल मधल्या विशिष्ट पत्त्यावर 100 शेल कंपन्या वर आढळून आल्या आहेत.
- अनिल देशमुख यांची निर्दोष सुटका झालेली नाही. कोर्टाने त्यांना “हेल्थ मिरीट”वर जामीन दिला आहे.
- सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल तेव्हा होईल या खटल्याचा अंतिम निकाल लागणार आहे.
Though Anil Deshmukh is out of Ather road jail, NCP welcomed him, the fact is different
महत्वाच्या बातम्या
- पवार काँग्रेस भवनात, अब्दुल्ला, मुफ्ती भारत जोडो यात्रेत; केंद्रात काँग्रेसचे वर्चस्व मान्यतेच्या दिशेने
- केंद्रात मोदी विरोधी आघाडी उघडण्याचा मनसूबा राखणारे केसीआर म्हणाले, मी मोदींचा बेस्ट फ्रेंड!; नेमका अर्थ काय?
- मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ लोकायुक्त कायद्याच्या जाळ्यात; महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक मंजूर; महाविकास आघाडी गैरहजर